Farmer Dr. Ravindra Nikam during ritual worship of saptnik tissue banana plants. esakal
जळगाव

Jalgaon News : कितीही असूदे ऊन, वारा...कितीही ही उतरुदे भाव..! आदर्श शेतकरी डॉ. रवींद्र निकम यांच्या केळीविषयी भावना

सुनील पाटील

Jalgaon News : तालुक्यातील माचले येथील राज्य शासनाचा आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी डॉ. रवींद्र निकम हे उत्कृष्ट सेंद्रिय नवतंत्रज्ञानाचा वापर करीत शेती करतात. दरवर्षी केळी, पपई, कलिंगड, हळद यांची लागवड करून भरघोस उत्पन्न घेतात. त्यांनी शुक्रवारी (ता. २४) आंबेमोहोर टिश्यू केळी लागवड केली. या वेळी त्यांनी या केळी रोपांची, लागवडीसाठी लागणाऱ्या साहित्याची सपत्नीक पूजा केली. त्यावेळी त्यांनी केळीविषयी शब्दातून व्यक्त केलेल्या भावना... (Dr Farmer Awarded Farmer Ravindra Nikam cultivates using best organic innovations)

निसर्गाने साथ दिली नाही तरी काळ्या आईची सेवा केल्याशिवाय शेतकऱ्यास झोप लागत नाही. वर्षानुवर्षे जरी दुष्काळ, अवकाळी पाऊस, तापमान, ऊन, वारा, वादळ यासह अन्य कारणाने उत्पादनात घट येत आहे. उत्पादन आलेच तर शासन त्यास भाव देत नाही. चारही बाजूंनी शेतकरी भरडला जात आहे. संप, आंदोलन करून इतरांना न्याय मिळतो, पण शेतकऱ्याचा वाली कुणी नाही. त्याला न्याय कुणी देत नाही. तरीही बळीराजा खंबीरपणे काळ्या आईची सेवा इमाने इतबारे करतो..अन् आपसूकच मनातली सल शेतीशी एकरूप असलेल्या डॉ. निकम यांच्या तोंडून बाहेर पडते..

'तुझ्यापासून लांब कसं जाऊ केळीबाई

तुला लावण्याशिवाय मला पर्याय नाही..!

कितीही असू दे ऊन, वारा कितीही उतरू दे भाव,

तरी तुला मी जीव लावतो राव..! (latest marathi news)

राज्यकर्ते या जगाच्या पोशिंद्याचा फक्त वापर करीत आहेत. पण एवढे सर्व सोपस्कार झाल्यावरही त्याला शेती कसण, उत्पादन घेणं थोडच सुटणार आहे. त्याला मृग नक्षत्राची छाया लागली, की तो शेतात स्वप्न पेरतो, उद्या ते स्वप्न सत्यात उतरो किंवा नाही, याचा विचार न करता काही लोक जुगार खेळतात. म्हणून डॉ.निकम म्हणतात..

तुझ्यासाठी सन, क्रॉप कव्हर, गादी वाफा, विद्राव्य खत,

डबल नळी तुझे एवढे करतो मी लाड!

जणू काही तूच माझे बाळ,

तुझ्यावर कधीही रुसत नाही,

संतापत नाही कितीही उतरुदे भाव,

एकदा तरी येऊ दे शेतकरी राजाची कीव

कीती लावतो तुला मुलांवानी जीव..!

शेतकरी शेतात बिजवाई टाकून निसर्गासोबत जुगार खेळतो, उद्या उत्पन्न येईल याची शाश्वती त्याला असते, काळ्या आईवर त्याचा विश्वास असतो म्हणून तो तिची सेवा करण्याचे काम कधी सोडत नाही. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा ठरतो, एवढं मात्र नक्की!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT