जळगाव : जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ६३३.६३ मिलीमिटर आहे. तर सुमारे ६६५ मिलीमिटर पाऊस झाला आहे. आतापर्यंत १५ तालुकास्तरावर सरासरी १२८.६३ टक्के पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यातील तीन मोठे, १४ मध्यमसह ९६ लघु अशा जवळपास सर्वच छोट्या, मोठ्या प्रकल्पात ९०.७८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या शेवटी मॉन्सूनची सुरूवात झाली. मध्यंतरी चांगला पाऊऊस झाला. जुलैमध्ये काही दिवस खंड पडला होता. (drinking water problem was solved with average of 128 percent rainfall in district )
परंतु जुलै मध्यापासून आणि ऑगस्ट, सप्टेबर दरम्यान झालेल्या पावसामुळे सरासरी पार केली आहे. सप्टेंबरमध्येही बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. यावर्षी मॉन्सूनची सुरवात वेळेवर झाली असली तरी मध्यंतरी जून-जुलै दरम्यान काही दिवस खंड पडला होता. जूनमध्ये सुरवातील हजेरी लावली. मात्र, जुलैच्या मध्यापासून आलेल्या पावसाने जुलै, ऑगस्ट महिन्यात जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात दमदार पावसामुळे लहान, मोठे सर्वच प्रकल्प प्रवाहीत झालेले आहेत. मोठ्या प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ झाली असून, सद्यःस्थितीत जिल्ह्यातील नऊ प्रकल्प शंभर टक्के भरले असून, त्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
रविवारपर्यंत ‘येलो अलर्ट’
नदी, नाले, ओढे खळाळून प्रवाहीत झालेले आहेत. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे काही मंडळात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. तर सप्टेंबर महिन्यात दहा बारा दिवस ओढ दिली होती. सोमवारी अचानक जोरदार हजेरी लावली असून, मंगळवारपासून आगामी तीन दिवस जळगाव जिल्ह्याला पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. रविवारपर्यंत (ता. २९) ढगाळ वातावरण व मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यात राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. (latest marathi news)
नऊ प्रकल्प शंभर टक्के भरले
जिल्ह्यातील नऊ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यात मोठ्या प्रकल्पांपैकी गिरणा, वाघूरसह सुकी, अभोरा, मंगरूळ, मोर, अग्नावती, तोंडापूर, बोरी अशा प्रकल्पांचा समावेश आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर ७७.३७ आणि मध्यम प्रकल्पापैकी हिवरा ६३.०४, बहुळा ६९.२८, अंजनी ६६.९२, गुळ ७६.६३, भोकरबारी ६.०६, मन्याड ७९.५०, शेळगाव बॅरेज ७०.७२ असे मोठ्या आणि मध्यम प्रकल्पात सरासरी ४३ हजार २ दशलक्ष घनफुट अर्थात ९०.७८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी २९ हजार २६२१.५१ दशलक्ष घनफूट अर्थात ६१.७७ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याची नोंद होती. गेल्या चोवीस तासात सर्वांत जास्त चोपडा तालुक्यात २३.३ मिलीमिटर पाऊस झाला आहे.
गेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस असा
जळगाव-- १४.२
भुसावळ-- ३.१
यावल-- ५.३
रावेर-- १०.८
मुक्ताईनगर--५.४
अमळनेर-- ६.९
चोपडा-- २३.३
एरंडोल-- ७.४
पारोळा-- ३.३
चाळीसगाव-- २.२
जामनेर-- ७.८
पाचोरा-- १०.२
भडगाव- १.८
धरणगाव-- १४.९
बोदवड--०
एकूण-- ८.६ मिलीमिटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.