national people's court  esakal
जळगाव

Jalgaon News : नियम मोडणाऱ्या वाहनधारकांनो... ‘हाजीर होऽऽ..’! दंड भरा, अन्यथा लोकअदालतीत या; साडेसहा हजार जणांना नोटीस

Latest Jalgaon News : जळगाव शहरात बेशिस्त वाहनधारक आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल साडेसहा हजार वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून मोबाईल संदेशाद्वारे मेमो बजावण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल साडेसहा हजार वाहनधारकांना दंड भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून, दंड न भरल्यास न्यायालयात लोकअदालतीत हजर राहण्याची समज देण्यात आली आहे. नोटीस बजावल्यापासून आजवर वाहतूक शाखेत दहा लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून, उर्वरित दंडाची वसुली रविवारी (ता.२९) होत असलेल्या लोकअदालतीत भरण्याची तजवीज करण्यात आली आहे. (Drivers who break rules Pay fine or come to People Court)

जळगाव शहरात बेशिस्त वाहनधारक आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल साडेसहा हजार वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून मोबाईल संदेशाद्वारे मेमो बजावण्यात आले आहेत. सलग सहा महिने उलटूनही या वाहन धारकांनी दंड भरलेला नसल्याने त्यांच्यावर नियमानुसार न्यायालयात खटला चालवला जाणार आहे.

खटला पूर्व तडजोडीसाठी या सर्व दंडआकारणी झालेल्या वाहन धारकांना लोकअदालतीत तडजोड करण्याची संधी देण्यात येत असून, तब्बल साडेसहा हजार वाहनधारकांना २९ सप्टेंबरला तडजोडीची तसेच सोबतच दंड भरण्याची संधी देण्यात येणार आहे.

सहा महिन्यांपासूनचे मेमो

गेल्या सहा महिने अगोदरपासून मेमो बजावलेले आणि त्या मेमोचा दंड न भरलेल्या वाहनधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, कार, दुचाकी, चारचाकी, अवजड वाहतूकदार अशा विविध वाहन प्रकरातील साडेसहा हजार वाहन धारकांचा या कारवाईत समावेश असून, मोबाईल संदेश, व्हॉटस्‌ॲप, प्रत्यक्ष घराच्या पत्त्यावर नोटीस बजावणीसाठी ४८ वाहतूक पोलिसांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल ५०० नोटिसा बजावणी करण्यात आली. पैकी दीड हजारांवर वाहनधारकांनी प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने दंडाची रक्कम भरून पुढील कारवाई टाळली आहे. (latest marathi news)

कुणाला मिळाल्या नोटीसा

- नो-पार्कींगमध्ये वाहन उभे करणे

- नो-इंट्रीत वाहन चालविणे

- फ्रंटसिट प्रवासी वाहतूक ऑटोरिक्षा

- विना हेल्मेट,

- रॅश ड्राइव्हिंग,

- सिग्नल ब्रेकिंग,

- अवैध प्रवासी वाहतूक

ऑनलाइनचा असाही उपद्व्याप

बहुतांश मेमो, नोटिसा या सध्या ऑनलाइन पद्धतीने बजावणी करण्यात येतात. त्यात मोबाईल संदेश, व्हॉटस्‌ॲप, वाहनधारकांचे ई-मेल याच्यावर दंड भरण्याचे समन्स बजावणी करण्यात येतात. मात्र, हा सायबर फ्रॉड असू शकतो, या भीतीने वाहनधारक तो, नंबरच ब्लॉक करीत असल्याचा कटू अनुभव आता यंत्रेणला येऊ लागला आहे.

दंड भरून कारवाई टाळावी

गेल्या सहा महिन्यांतील वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्या साडेसहा हजार वाहनधारकांना वाहतूक विभागाकडून समन्सची बजावणी करण्यात आली आहे. गेल्या देान दिवसांत जवळपास दीड हजारांवर वाहनधारकांनी भरणाही केला आहे.

उर्वरित वाहनधारकांनी तातडीने दंड भरावा, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सोबतच वाहतूक शाखेत येऊन दंड भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही वाहतूक निरीक्षक राहुल गायकवाड यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT