raksha khadse and shriram patil esakal
जळगाव

Raver Lok Sabha : रावेरमध्ये दुरंगी फाईट, भुसावळमध्ये वातावरण टाईट! महायुतीकडून विकास तर आघाडीकडून समस्यांचा मुद्दा ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : भुसावळ तालुक्यात रावेर लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीचे उमेदवार खासदार रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीत आमदार संजय सावकारे व माजी आमदार संतोष चौधरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोण होणार खासदार, यावर पैजा लागल्या आहेत. (jalgaon dual fight in Raver loksabha news)

शेती मालासह दुधाचे घसरलेले बाजार भाव, कांदा निर्यात बंदीवरून राजकारण शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागले आहे. सामान्य जनता महागाईने होरपळत आहे. बेरोजगार तरुणांचा रोष वाढला आहे, असे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगत आहेत. तर गत दहा वर्षात रस्त्यांची कनेक्टीव्हीटी वाढवली, रस्त्यांचे जाळे मजबूत केले, महिला सक्षमीकरण केले व रेल्वे स्थानकांचा विकास केल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. परस्परांच्या विजयाच्या दाव्यामुळे रावेर मतदारसंघामध्ये दुरंगी फाईट होणार असल्याने भुसावळ तालुक्यात वातावरण टाईट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

दोन्हीकडून विजयाचा दावा होत असला, तरी शेवटी एकच जण विजयी होणार आहे. त्याचा प्रभाव मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येणार आहे. त्यामुळे, आमदार संजय सावकारे व माजी आमदार संतोष चौधरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोघांच्याही पायाला भिंगरी लावून गावोगावी प्रचार सुरु आहे.

त्यामुळे कमळ व तुतारी वाजविणारा माणूस अशी दोन्ही चिन्हे घरोघरी पोहोचत आहेत. महायुती व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भर उन्हात दुचाकीवर व पायपीट करीत प्रचारासाठी उन्हातान्हात घाम गाळताना दिसत आहेत. भुसावळ येथे ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मंत्री जयंत पाटील यांनी श्रीराम पाटील यांच्यासाठी भुसावळमध्ये पक्षाची बैठक घेतली. (Jalgaon Political News)

तर रक्षा खडसे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांची सभा झाली. सभेत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे रक्षा खडसेंना त्यांचे समर्थन आहे असे देखील दिसून आले. खडसे आणि पाटील यांच्या विजयाचे दावे करणाऱ्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी पैजा लावल्याचे देखील समोर येत आहे. मात्र काही महाशय विशिष्ट कार्यकर्ते सोशल मीडियावर शाब्दिक हल्ले करीत असून एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत.

मात्र आपला पराक्रम इतर लोक पाहत आहेत, याचे देखील भान ठेवले जात नाही. त्यामुळे ‘चहापेक्षा किटल्या गरम’ असे बोलले जात असतांना अनेक दिग्गज नेते या पक्षातून त्या पक्षात गेल्याने कोणत्या तोंडाने लोकांपुढे जावे असे स्वतःच्या मनाला वाटत असतांनाही जो तो आपल्या पक्षाचा प्रचार रेटून करीत आहे. सामान्य कार्यकर्ता हा खरा पक्षाचे कार्य गावपातळीवर पोहचवतो मात्र त्याची खरी पंचायत झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT