Jalgaon Monsoon : जिल्ह्यात जुलै व ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाला. यामुळे पिकांची स्थिती चांगली आहे. पावसाने उघडीप दिल्यास पिकांची वाढ होवून लागलेल्या शेंगा भरण्यास मदत होणार आहे. कपाशीला पाने व फुले लागली आहेत. उडीद, मुगाला शेंगा लागल्या आहेत. यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हाती चांगला हंगाम येणार आहे, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. रावेर, यावल तालुक्यांत १०९ टक्के पाऊस झाल्याने या तालुक्यांनी शंभरी पार केली आहे. (Due to good rainfall in district in July and August condition of crops is good s)
आतापर्यंत दोन महिन्यांतील सरासरीच्या (ऑगस्टपर्यंतच्या) ४५१ मिलिमीटर (अपेक्षीत ३७६ मिलिमीटर) ११० टक्के पाऊस झाला आहे, तर एकूण सरासरीच्या ६२ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे पिकांची स्थिती चांगली आहे. काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. यामुळे पिकातील तण काढण्यास, पिकांना खते देण्यास मदत झाली.
मात्र, ज्या ठिकाणची जमील खोलगट आहे, अशा ठिकाणी पाणी साचून राहते. त्याठिकाणच्या पिकांना काहीअंशी धोका आहे. जिल्ह्यात कपाशी, उडीद, मुगाचे पीक जोमात आहे. फक्त पावसाची उघडीप पाहिजे. उडीद, मुगाला शेंगा लागल्या आहेत. कपाशीला फुले लागली आहेत. पावसाने उघडीप दिल्यास पिकांची वाढ अधिक जोमाने होईल.
२६६ हेक्टरवर नुकसान
मागील आठवड्यात जळगाव व चोपडा तालुक्यात संततधार पावसाने २६६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. त्याचा अहवाल जिल्हाधिकारी व राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे.
''जूनमध्ये पावसाने ओढ दिली तरी जुलै, ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाला आहे. यामुळे पिकांची वाढ जोमाने होत आहे. कापूसाला फुले लागली आहेत. उडीद, मुगाला शेंगा लागल्या आहेत.''-के. एम. तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (latest marathi news)
तालुकानिहाय झालेला पाऊस (टक्क्यांमध्ये)
जळगाव--९७.१
भुसावळ--६२.४
यावल--१०९
रावेर--१०९.९
मुक्ताईनगर--९७
अमळनेर--४३.२
चोपडा--८७.५
एरंडोल--२६.६
पारोळा--३२.०
चाळीसगाव--२६.९
जामनेर--३९.०
पाचोरा--३०.७
भडगाव--३३.४
धरणगाव--६३.८
बोदवड--८६.२
एकूण--६२.३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.