Dilapidated main road in Nageshwar Colony in Ward 13. This is the road that has become a victim of the internal politics of the corporators. esakal
जळगाव

Jalgaon News : ठराविक भागातच रस्ते, उर्वरित परिसर खड्ड्यातच! नगरसेवकांच्या अंतर्गत राजकारणात सुविधांचा बळी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : रस्त्यांमधील खड्ड्यांनी जळगावकरांना आयुष्यभराचे हाडांचे दुखणे लावल्यानंतर रस्त्यांची कामे मार्गी लागली असली, तरी प्रभाग १३ मधील नगरसेवकांमधील अंतर्गत राजकारणामुळे या भागातील पश्‍चिमेकडील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. या प्रभागात विशिष्ट भागातच रस्त्यांची कामे झाली असून, उर्वरित परिसर खड्ड्यातच आहे. विशेष म्हणजे वर्षभरापासून मुदत संपल्यानंतर नगरसेवकही गायब झाले असून, महाबळ ते थेट संभाजीनगरपर्यंतचा परिसर नागरी सुविधांबाबत अक्षरश: वाऱ्यावर आहे. ( internal politics among councillor in Ward 13 plight of roads in western part of area continues)

ज्या भागात रस्ते नाहीत, तेथील समस्यांबाबत नगरसेवकांना विचारले असता, ते एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचा प्रकारही समोर आला आहे. प्रभाग १२ व १३ या लगतच्या प्रभागांमधील समतानगरचा परिसर सोडला, तर उर्वरित संपूर्ण परिसर नोकरदार, सुशिक्षित व प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या रहिवाशांचा आहे. वेळेत कर भरण्यापेक्षाही या भागातील नागरिक मालमत्ता कराची नोटीस मिळण्याआधीच कर भरून सूट (रिबेट) घेतात. असे असताना, परिसरातील नागरिकच नागरी सुविधांपासून वंचित आहेत.

रस्त्यांच्या कामात दुजाभाव

काही वर्षांपासून जळगाव शहरातील रस्त्यांची दुरवस्था राज्यात गाजली. अमृत योजनेंतर्गत कामामुळे होत्या. त्या रस्त्यांचीही वाट लागली. प्रभाग १३ मध्ये काव्यरत्नावली चौकापासून महाबळपर्यंतच्या डावीकडचा (पूर्वेकडील) संपूर्ण भाग व महाबळ बसथांब्यापासून गाडगेबाबा चौकापर्यंत व पुढे या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेला परिसर येतो. अशा वाट लागलेल्या रस्त्यांच्या व्यथेत प्रभाग १३ अपवाद नव्हता.

मात्र, वेगवेगळ्या मंजूर निधीतून संपूर्ण शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपरस्ते, वाढीव वस्त्यांमधील, गल्ली-बोळातील रस्ते होत असताना, प्रभाग १३मध्येही ही कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली. त्यातील मोहननगर, चंद्रलोक अपार्टमेंट, शारदा कॉलनी, नूतन वर्षा कॉलनी, त्र्यंबकनगर, मोहाडी रोड आदी परिसरात सर्वत्र डांबरीकरण, कॉंक्रिटीकरण वेगाने करण्यात आले. मात्र, महाबळ ते गाडगेबाबा चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या पश्‍चिमेकडील परिसरातील रस्त्यांबाबत नगरसेवकांनीच दुजाभाव केल्याचे आता उघड झाले आहे. (latest marathi news)

या परिसरावर अन्याय

महाबळ थांब्यापासून मुख्य रस्त्याच्या पश्‍चिमेकडे (उजव्या बाजूला) नागेश्‍वर कॉलनी, हनुमान कॉलनी, मकरंदनगर, लाईफस्टाईल रेसिडेन्सीचा भाग, संभाजीनगर, विवेक कॉलनी, अशा लहान-मोठ्या वस्त्या आहेत. या परिसरातील शंभर टक्के नागरिक प्रामाणिक करदाते आहेत. असे असूनही या भागात कुठेही नव्याने रस्त्याचे काम केलेले आढळून येत नाही.

नागेश्‍वर कॉलनी, हनुमान कॉलनी, मकरंदनगरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मात्र, या भागात रस्त्यांचे नूतनीकरण तर सोडाच, पण दुरुस्तीही झालेली नाही. त्र्यंबकनगर शाळेपासून नागेश्‍वर कॉलनी रिक्षा थांब्यापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असून, दुचाकी- चारचाकी चालविणे सोडा, चालणेही कठीण झाले आहे.

नगरसेवकांमधील राजकारण

शहरात सर्वत्र रस्त्यांची कामे सुरू असताना, या भागातील रस्ते का होत नाही, याबाबत प्रभाग १३ मधील नगरसेवकांना विचारले असता, त्यांच्याकडून केवळ टोलवाटोलवी करण्यात आली. एकाने सांगितले, ‘मी काम प्रस्तावित केले होते, दुसऱ्याने रद्द करायल लावले’, तर दुसऱ्या नगरसेवकाने ‘कॉंक्रिटच्या रस्त्यांमध्ये काम घेतले आहे, काही दिवसांनी होईल’, असे सांगत वेळ मारून नेली. प्रत्यक्ष चौकशी केली असता, या भागातील एकाही रस्त्याचे काम प्रस्तावित केल्याचे आढळून आले नाही. नगरसेवकांच्या अंतर्गत राजकारणात या रस्त्यांच्या कामांचा बळी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

नगरसेवक गायब

वर्षभरापूर्वी जळगाव महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपली आहे. तेव्हापासून नगरसेवक माजी झाले आहेत. मात्र, मुदत संपण्याआधीपासूनच या प्रभागातील नगरसेवक गायब आहेत. प्रभागातील वर उल्लेख केलेल्या भागात नगरसेवकांचे दर्शनच झालेले नाही. श्रीमती ज्योती चव्हाण, अंजना सोनवणे, सुरेखा तायडे यांना तर या भागातील नागरिकांनी अद्यापही पाहिलेले नाही. जितेंद्र मराठे थोडेफार फिरत होते. मात्र, निवडून आल्यानंतर दोन- तीन वर्षेच. नंतर तेही गायब झाले.

ज्या भागात राहतात, तिथेच सुविधा

प्रभाग १३ मधील चारही नगरसेवकांचा रहिवास मोहाडी रस्त्यालगत आहे. महाबळ ते गाडगेबाबा चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या डावीकडील (पूर्वेकडील) भागात नगरसेवक राहतात. श्रीमती अंजना सोनवणे शहरातील रहिवासीही नाहीत. उर्वरित तिघे ज्या परिसरात राहतात, त्या भागाचीच काळजी घेताना दिसतात.

गेल्या पाच-सहा वर्षांत नागेश्‍वर कॉलनी, विवेक कॉलनी, संभाजीनगर या भागांत संबंधित नगरसेवकांनी पुरेसे लक्ष दिलेले नाही. या भागात नियमित स्वच्छता होत नाही, पथदिवेही नाहीत. अन्य नागरी सुविधांचा अभाव आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे. या भागातील नागरिक त्यांचे मतदार नाहीत का, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT