farmer waiting for rain esakal
जळगाव

Jalgaon Rain Crisis : पावसाअभावी चोपडा तालुक्यात पेरणी खोळंबली! शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, जोरदार पावसाची प्रतिक्षा

सकाळ वृत्तसेवा

धानोरा (ता. चोपडा) : धानोरासह परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. जिरायती व बागायती कापूस लागवड फारच कमी झाली आहे. तालुक्यात पेरणीयोग्य क्षेत्र ६४ हजार हेक्टर आहे. फक्त २० टक्केच पेरण्या झाल्या आहेत. जूनच्या सुरवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकरी जोरदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (Jalgaon Due to lack of rain sowing disrupted in Chopda taluka)

काही शेतकऱ्यांनी जूनच्या सुरवातीलाच पाऊस लवकर पडणार, या आशेवर लागवड केली. नंतर जोरदार पाऊस झाला नाही. पेरणी केलेल्या बियाण्यांना अंकुर फुटले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करावी लागणार आहे. यंदा हवामान विभागाने चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत केले असले, तरी जून संपत आला तरीही पाऊस न पडल्याने शेतकरी अधिकच चिंतेत सापडला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरणी आटोपली. नंतर तब्बल १५ ते २० दिवसांपासून पावसाने दगा दिला आहे. ज्यांनी पेरणी केली, त्यांची बियाणे पूर्णतः वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे. (latest marathi news)

खते, बियाणांवर केलेला खर्च वाया

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी खते व बियाण्यांवर केलेला खर्च वाया गेल्याने शेतकरीचे कंबरडे मोडले आहे. यात पावसाने दडी मारल्याने पेरणी झालेल्या पिकांची फुटलेले अंकुर पावसाअभावी कोमेजू लागले आहेत. येत्या दोन दिवसांत पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारे नवीन बियाणे खरेदीसाठी पैसा आणावा कोठून, असा प्रश्न पडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT