fodder esakal
जळगाव

Jalgaon News : चाराटंचाईमुळे गोशाळाचालक रडकुंडीस! लाखमोलाचे गोधन दत्तक द्यायला तयार

Jalgaon : गोवंशपालनाला असाही पशुपालकांचा फारसा प्रतिसाद नसतो. उलट गोशाळेकडे पशुधन पाठवून जबाबदारीतून मुक्त होण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : चाराटंचाईमुळे गोधन सांभाळणे गोशाळाचालकांना कठीण झालेले आहे. यासाठी पशुप्रेमी शेतकऱ्यांसह नागरिकांनी चाऱ्यासाठी मदत करावी, अथवा इच्छुकांनी गायी दत्तक घ्याव्यात, असे आवाहन गोशाळा संचालकांकडून करण्यात येत आहे. गोवंशपालनाला असाही पशुपालकांचा फारसा प्रतिसाद नसतो. उलट गोशाळेकडे पशुधन पाठवून जबाबदारीतून मुक्त होण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. ( scarcity of fodder difficult for Goshala member to take care of cows)

त्यांचाही काही दोष नाही. चारापिकांची लागवड कमी होणे, शेतमालाला भाव नसणे, उत्पादनखर्च भरमसाठ, मनुष्यबळाचा अभाव, साठवणुकीसाठी अपुरी जागा अशा अनेक कारणांमुळे शेतकरी गोसेवेची इच्छा असूनही गायी पाळत नाहीत. शहरी भागात कुत्रे आलिशान गाडीतून फिरतात, त्यांचे दवाखाने चालतात, डॉक्टरही भरमसाठ शुल्क आकारतात. तीही मालक भरतात अन्‌ गायी बिचाऱ्या फेकलेल्या प्लॅस्टिक पिशव्यातले नासके अन्न पिशव्यांसकट खाऊन मृ त्यूला कवटाळतात कारण त्यांना उपचार नाही, देखभाल नाही अशी विदारक अवस्था दिसून येते.

आपल्याकडे ग्रामीण भागात परिस्थिती इतकी भीषण नसली तरी बिकट मात्र, नक्कीच आहे. गोवंश कमी होत चालला आहे. गौशाळा अडचणीत आल्या आहेत. धरणगाव येथील कामधेनू गोशाळेत स्प्रिंकलर बसविण्यासाठी अनेक दात्यांनी उदार मनाने सहकार्य केले. चाऱ्यासाठीही मदत करीत असतात. सध्या एक शेड वाढविण्याचे काम सुरू आहे. वाढत्या गाईंच्या संख्येमुळे गरजा वाढत आहेत.

त्यासाठी नागरिकांनी वाढीव शेड, स्प्रिंकलर व चाऱ्यासाठी मदत करावी, असे आवाहन धरणगाव येथील कामधेनू गोशाळेचे अध्यक्ष प्रा. सी. एस. पाटील यांनी केले आहे. कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाचे ट्रक रोज पकडले जात आहेत. निर्दयपणे गायी अन्‌ गोवंशाची कत्तल होत आहे. याला काही अंशाने तरी जबाबदार तुम्ही-आम्ही सर्वजण आहोत. हे असेच सुरू राहिले तर एक दिवस ‘गाय’ फक्त चित्रातून पुढच्या पिढ्यांना दाखवावी लागेल. (latest marathi news)

त्यासाठी सर्व दानशूर दात्यांनी आपल्या परिसरात जी छोटी-मोठी गोशाळा असेल, तिला अवश्य भेट द्यावी. आठवड्यातून एकदा जवळच्या गोशाळेतील अडचणी जाणून घ्याव्यात, गायींच्या पाठीवर नुसता हात फिरवावा, त्या त्यांच्या मूकभाषेत तुमच्याशी बोलतील. त्यांच्या मुक्या वेदना समजून घ्याव्यात, गायी दत्तक देण्याची वेळ कोणत्याही गोशाळेवर येऊ देऊ नका, असे आवाहनही गोशाळा संचालकांकडून करण्यात येत आहे.

सरकारने गायींसाठी अनुदान द्यावे!

या गोशाळांना कसलेही सरकारी अनुदान नाही. म्हणून सरकारने गायींसाठी दरडोई पद्धतीने ठराविक रक्कम अनुदान म्हणून सरसकट मंजूर केली पाहिजे, अशी मागणी गोशाळा संचालकांकडून होत आहे. ज्यांना गोमातेचे आशीर्वाद हवेत, अशा श्रीमंत वर्गाने दरमहा ठराविक दानराशी गोशाळेला द्यावी. आपल्या कुटुंबात विवाह, वाढदिवस, सेवानिवृत्ती, पूर्वजांचे पुण्यस्मरण यासारखे संस्मरणीय कार्यक्रम असतील, त्यावेळी गायींचा वाटा अवश्य काढून त्यांना स्वहस्ते चारा, वैरण, खुराक खाऊ घालावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

''धरणगावसह परिसरातील इतर गोशाळांची स्थिती याहून वेगळी नाही. अशास्थितीत 'आपल्या चतकोरीतले नितकोर’ देण्याची आपली जी संस्कृती आहे, तिला अनुसरून प्रत्येक शेतकऱ्याने चाऱ्याच्या चारसहा पेंढ्या गोशाळेसाठी बाजूला काढाव्यात, गावातील प्रत्येकाने असे केले, तर एक दोन ट्रॅक्टर चारा एकाएका गावात सहज उपलब्ध होईल. गायींचे प्राण वाचविण्याचे पुण्य आपणाला मिळेल.''- प्रा. सी. एस. पाटील, अध्यक्ष, कामधेनू गोशाळा, धरणगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : युगेंद्र पवारांच्या सांगता सभेत शरद पवारांंचं भाषण

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT