Completed Shelgaon Project on River Tapi. esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : सिंचन समृद्धीत जळगाव जिल्ह्याचा पूर्व भाग नशिबवान; ‘मेगारिचार्ज’साठी पाठपुरावा आवश्‍यक

Lok Sabha Constituency : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भाग हा पश्‍मिच भागापेक्षा सिंचन समृद्धीबाबत नशीबवान मानला जातो.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भाग हा पश्‍मिच भागापेक्षा सिंचन समृद्धीबाबत नशीबवान मानला जातो. तापी खोरे विकास महामंडळाच्या स्थापनेनंतर जे काही प्रकल्प कालांतराने मार्गी लागले असले, तरी ते बहुतांश याच भागातील आहे. गेल्या दहा वर्षांतील कार्यकाळ पाहता शेळगाव बॅरेजची परिपूर्ती ही मोठी उपलब्धी समजली जाते. त्याशिवायही मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ तालुक्यातील उपसा सिंचन योजना या क्षेत्रासाठी लाभदायी ठरत असून, त्यातून कृषिक्षेत्राची समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे. ( East part of district needs follow up for megacharge in irrigation prosperity )

जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघांचा भौगोलिकदृष्ट्या विचार केला, तर रावेर लोकसभा मतदारसंघ हा जिल्ह्याचा पूर्व भाग, तर जळगाव लोकसभा क्षेत्र पश्‍चिम भागात आहे. त्यामुळे पूर्व भाग म्हणजे तापी परिसर. अर्थात, रावेर लोकसभा क्षेत्र सिंचन प्रकल्पांबाबत अधिक सुदैवी ठरलेय. तापी खोरे विकास महामंडळांतर्गत तापी पट्ट्यात अनेक सिंचन प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

काही प्रकल्प पूर्ण झालेत, तर काही अद्याप निधीअभावी पूर्ण होऊ शकलेले नाहीत. सिंचन प्रकल्पच नव्हे, तर थेट शेतीला लाभ होण्यासाठी उपसा सिंचन योजनाही प्रस्तावित करण्यात आल्या. तापी खोऱ्यातील मोठमोठ्या उपसा सिंचन योजनांमुळे लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली येऊन लाखो शेतकऱ्यांचे आयुष्यमानच बदलणार आहेत.

‘शेळगाव’ने समृद्धी

गेल्या दहा वर्षांत सिंचन प्रकल्पांचा आढावा घेतला, तर तापी नदीवरील सर्वांत महत्त्वाचे शेळगाव बॅरेज अलीकडच्या काळातच पूर्ण झाले आहे. एकनाथ खडसे यांनी तापी खोरे अंतर्गत या प्रकल्पाचा पाया रचला. (स्व.) हरिभाऊ जावळेंनी प्रकल्पाचे काम पुढे कसे जाईल, यासाठी पाठपुरावा केला. फडणवीस सरकारच्या काळात जलसंपदा खाते असलेल्या मंत्री गिरीश महाजनांनी या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यतेचा ‘बुस्टर’ दिला. (latest marathi news)

केंद्रात रावेर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रक्षा खडसेंचाही पाठपुरावा कामी आला आणि हा प्रकल्प मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या बळीराजा संजीवनी योजनेत समाविष्ट झाला. त्यानंतर या प्रकल्पाचासाठी केंद्राचा निधी मिळून त्याचे काम गतीने पूर्ण झाले. गेल्यावर्षी त्यात पाणीही अडविण्यात आलेय.

आता त्यावरील उपसा सिंचन योजनेसाठी पाठपुरावा आवश्‍यक आहे. उपसा योजना कार्यन्वित नसली, तरी या प्रकल्पात पाणी अडल्याने सभोवतालची भूजल पातळी वाढून विहिरी, ट्यूबवेलची पाणी पातळी वर आली. हा अप्रत्यक्ष लाभ जळगाव तालुक्यासह भुसावळ, यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळतोय.

अन्य योजनांसाठी पाठपुरावा

खासदार रक्षा खडसे यांनी मतदारसंघातील प्रलंबित व प्रस्तावित सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. कुऱ्हा-वढोदा-इस्लामपूर उपसा सिंचन योजनेच्या २ हजार २२६ कोटींच्या सुधारित खर्चास मंजुरी, वाघूर उपसा सिंच योजनेच्या २२८८ कोटींचा खर्चास मंजुरी, हतनूर उपसा सिंचन योजनेसाठी ५३६ कोटी, वरणगाव-तळवेल उपसा योजनेसाठी ८६१ कोटी, बोदवड परिसर सिंचन योजना टप्पा-१ चा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करून ४३४ कोटींच्या निधीस मंजुरी आदी योजनांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.

‘मेगारिचार्ज’साठी प्रयत्न

रावेर लोकसभेतील तालुक्यांसह मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर व परिसरासाठी तापी पट्ट्यातील ही मेगारिचार्ज योजना संजीवनी ठरणार आहे. खरेतर तापी व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यांमध्ये केळी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यासाठी भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा अनेक वर्षांपासून होत असल्याने भूगर्भजल पातळी खूप खाली गेली होती. तीन- चार तालुके तर ‘डार्क झोन’मध्ये गेलेत आणि त्यातूनच अशा प्रकारची जलपुनर्भरण (मेगारिचार्ज) योजना निर्मितीचा विषय समोर आला.

अद्याप या योजनेसंदर्भात कुठलीही कार्यवाही झालेली नाही. मात्र, मोदी सरकारच्या काळात तत्कालीन जलस्त्रोत मंत्री उमा भारती, मंत्री गिरीश महाजन यांनी या योजनेसाठी हवाई सर्वेक्षण केले होते. योजनेचा विस्तृत प्रकल्प अहवाल बनविण्याची कार्यवाही सुरू असून, त्यासाठी आता प्रभावीपणे पाठपुरावा करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT