Members of the Khadse family cheering at their residence in Muktainagar after Raksha Khadse was informed about taking oath as a minister. esakal
जळगाव

Jalgaon Political News : सुनेला मंत्रिपद मिळण्याचा आनंद जीवनातील सर्वोच्च : एकनाथ खडसे; रक्षा पदाला नक्कीच न्याय देतील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Political News : जनतेच्या आशीर्वादाने मी सलग सहा वेळा मुक्ताईनगरातून आमदार झालो. सूनबाईला मतदारांनी आशीर्वाद दिल्याने ती तिसऱ्यांदा खासदार झाली आणि आता केंद्रातही मंत्रिपद मिळतंय. आयुष्यात आनंदाचे जे क्षण आले, त्यापैकी सर्वोच्च आनंदाचा हा क्षण आहे, अशी भावना व्यक्त करीत मतदारसंघ, जळगाव जिल्ह्यासाठी रक्षा नक्कीच योगदान देऊन पदाला न्याय देतील, असा विश्‍वास ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. (Jalgaon eknath khadse reaction on Raksha khadse achievement)

रावेर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा खासदार झालेल्या रक्षा खडसेंना रविवारी (ता. ९) सकाळी पंतप्रधान कार्यालयातून ‘मोदी ३.०’ सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेण्याबाबत फोन आला. रक्षा खडसे दिल्लीतच असताना मुक्ताईनगरला खडसे कुटुंबीयांनाही या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळाले.

खासदार म्हणून हॅटट्रिक साधत असताना आता सूनबाई थेट केंद्रात मंत्री होत असल्याने त्याबद्दल खडसेंची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, की या संपूर्ण रावेर मतदारसंघातील मतदारांनी, जनतेने खडसेंना नेहमीच आशीर्वाद दिलेत. मुक्ताईनगरातून मला सलग सहा वेळा निवडून दिले.

रावेर लोकसभेतून रक्षा आता तिसऱ्यांदा खासदार झालीय. मोदींसह भाजपने रक्षावर विश्‍वास दर्शवून तिला मंत्री करण्याचे ठरविले, त्याबद्दल पक्षनेतृत्वाचे आभार. आयुष्यभरातील मेहनत फळाला आली. जीवनात रक्षानेही खूप संघर्ष केला, त्याचे फलित तिला या स्वरूपात मिळतेय. आमच्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा प्रसंग आहे.

मंत्रिपदाच्या माध्यमातून केवळ मतदारसंघ, जळगाव जिल्हाच नव्हे, तर राष्ट्राच्या समृद्धीत रक्षा निश्‍चितपणे योगदान देईल व पदाला न्याय देईल. यानिमित्त आपल्या भागातील प्रकल्प, योजना पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा असून, त्यासाठी आपण नेहमीच मार्गदर्शन करू, असे खडसे म्हणाले. (latest marathi news)

खडसे परिवार दिल्लीकडे

सुनबाईच्या मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी खडसे परिवार रविवारी दुपारीच दिल्लीकडे रवाना झाला. एकनाथ खडसेंसह त्यांच्या पत्नी मंदाताई, रक्षा खडसेंची मुलगी क्रिशिका, मुलगा गुरुनाथ, भाचा असे परिवारातील सदस्य विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले.

खडसे परिवारात तिसऱ्यांदा मंत्रिपद

रक्षा खडसे यांना केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळतेय. यानिमित्त खडसे परिवारात मंत्रिपदाची ही तिसरी वेळ आहे. १९९५ ते ९९ या शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळात एकनाथ खडसे स्वत: सुरवातीला उच्च व तंत्रशिक्षण, नंतर अर्थ व नियोजन आणि ९८-९९ मध्ये पाटबंधारेमंत्री होते.

२०१४ मध्ये राज्यात फडणवीस सरकार आले, तेव्हा जून २०१६ पर्यंत खडसेंकडे महसूल, कृषीसह विविध १२ खात्यांचे मंत्रिपद होते. आता रक्षा खडसेंना केंद्रात मंत्रिपद मिळत असून, त्यांच्या खासदारकीच्या हॅटट्रिकसह खडसे परिवारातील मंत्रिपदाची हॅटट्रिक यानिमित्ताने होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT