Cyber Crime esakal
जळगाव

Jalgaon Cyber Crime : शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून वृद्धाची 59 लाखांत फसवणूक; जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Cyber Crime : याप्रकरणी गुरुवारी (ता. १८) जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Cyber Crime : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासह अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चाळीसगाव येथील निवृत्त वृद्धाची ५९ लाख रुपयांत ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. १८) जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (Elder cheated of 59 lakhs by pretending to share trading)

चाळीसगाव शहरात ५९ वर्षीय व्यक्ती परिवारासह वास्तव्याला आहेत. ते महावितरण कंपनीतून अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहे. १५ जानेवारीला त्यांना कॅथरिन मॅकवेल नावाच्या संस्थेच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवत वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपला जॉईन करून घेण्यात आले. नंतर त्यांना एक लिंक पाठवून गुंतवणूक केल्यास त्यांना अधिकचा नफा होणार असल्याचे आमिष दाखविले.

तीन महिन्यात भरली रक्कम

त्यानुसार निवृत्ताने १५ जानेवारी ते १९ मार्चदरम्यान वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने ५८ लाख ९५ हजार ३५१ रुपये भरले. रक्कम भरल्यानंतरही नफा मिळत नसल्याने व मुद्दलही गेल्याने आपली फसवणूक झाल्याची ज्येष्ठ नगरिकाची खात्री झाली. अखेर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या

आजचे राशिभविष्य - 17 नोव्हेंबर 2024

Uddhav Thackeray : भाजपचा ‘सत्ता जिहाद’ महाराष्ट्राची जनता संपवेल! : उद्धव ठाकरेंची गर्जना

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 नोव्हेंबर 2024

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ नोव्हेंबर २०२४ ते २३ नोव्हेंबर २०२४)

SCROLL FOR NEXT