Lok Sabha Election 2024 esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election 2024 : निवडणूक खर्चालाही महागाईची झळ; उमेदवाराला 95 लाखांची मर्यादा

Jalgaon News : लोकसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर इच्छूक असलेले उमेदवार कामाला लागले आहेत. काहींच्या बैठका, मतदारांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : लोकसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर इच्छूक असलेले उमेदवार कामाला लागले आहेत. काहींच्या बैठका, मतदारांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे प्रचार साहित्यही मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. यंदा निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराकाठी ९५ लाखांच्या खर्चाची मर्यादा ठेवली आहे. मात्र वाढत्या महागाईमध्ये सर्वच वस्तूंचे आणि प्रचार साहित्याचे दर वाढले आहेत. (Lok Sabha Election 2024)

त्यामुळे उमेदवारांचा खर्च वाढणार असून ९५ लाखांपेक्षा अधिक होणार असल्याचे राजकीय पक्षाने पदाधिकारी सांगतात. निवडणूकीच्या खर्चासाठी राजकीय पक्षाकडून मिळालेली मदत व स्वताचा निधी याचा मेळ बसविताना उमेदवारांची चांगलीच अडचण होणार आहे. शासनाने दिलेल्या खर्चाच्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च करणाऱ्या उमेदवाराला कारवाईच्या सामोरे जावे लागणार आहे.

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेतच खर्च करणे अपेक्षित आहे. शिवाय खर्चाचा हिशेब दररोज सादर करणे बंधनकारक आहे. जळगाव व रावेर मतदारसंघात एकूण बारा विधानसभा मतदार संघ आहेत. प्रचार साहित्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे प्रचार साहित्यातच उमेदवाराचा मोठा खर्च असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रशासनाने ठरवून दिलेल्या किमतीत खर्च करणे कठीण असल्याने उमेदवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा मतदारसंघाचा मोठा असलेला आवाका आणि त्या आवाक्यात असलेले कार्यकर्ते यांच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार होणार असल्याने उमेदवाराचा खर्च वाढणार आहे. (latest marathi news)

जळगाव व रावेर लोकसभेतील बारा विधानसभा मतदारसंघ विभिन्न भौगोलिक परिस्थितीत असल्याने प्रचार करताना उमेदवारांसह व कार्यकत्यांना हेलपाटे मारावे लागणार आहेत. शासनाने कार्यकर्त्यांच्या जेवणाच्या ताटाचे दर जरी ठरवून दिले असले, तरी त्या दरात जेवणाचा खर्च होणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.

या काळात शासनाकडून निवडणुकीत वाढवून देण्यात आलेली मर्यादा कमी ठरणार असल्याचे विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

प्रचार साहित्याच्या वाढल्या किमती

सध्या पारंपरिक प्रचार साहित्य कालबाह्य झाले आहे. त्याचा वापर होणे आता कमी झाले असून सध्या डिजिटल साहित्याचा वापर होत आहे. डिजिटल बोर्ड, फ्लेक्स, बनरमुळे उमेदवाराचा खर्च वाढणारा आहे. त्यात समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे उमेदवाराचा खर्च वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आयोगाकडून वाढीव मंजूरी

गत लोकसभा निवडणुकीत एका उमेदवाराला ७० लाख रुपयांची खर्चाची मर्यादा देण्यात आली होती. वाढत्या महागाईमुळे दिलेल्या खर्चाच्या मर्यादेत खर्च करणे अवघड करणे असल्याची ओरड अनेक नेत्यांकडून झाली होती.

यामुळे २०२४ च्या निवडणूकीत खर्च करणे अवघड असल्याची ओरड अनेक नेत्यांकडून झाली होती. यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ही मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला, यात २५ लाख रुपयांची वाढ करून ही मर्यादा आता ९५ लाख रुपये करण्यात आली आहे. खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात आली असली, तरी मोठया राजकीय पक्षांच्या उमेदवाराकडून ही मर्यादा कमी असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT