Chopda Sugar Factory esakal
जळगाव

Jalgaon News: पैसे मिळेपर्यंत ‘चोसाका’च्या मालमत्तेवर बोजा बसवा; राष्ट्रीय कामगार संघाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेडकडे कामगारांचे थकीत वेतन व भविष्यनिर्वाह निधीची रक्कम घेणे आहे. जोपर्यंत ही रक्कम मिळत नाही, तोवर चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखानाच्या स्थावर, जंगम मिळकतींवर बोजा बसविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय कामगार संघ चोपडा शाखेचे (इंटक प्रणित) अध्यक्ष भागवत मोरे, उपाध्यक्ष विश्वनाथ सोनवणे, सचिव सुनील पाटील, सहसचिव रामकृष्ण पाटील, धोंडू पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी ‘चोसाका’च्या संचालक मंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Jalgaon Encumbrance on Chopda sugar factory)

निवेदनात म्हटले आहे की, चोपडा कारखाना हा बारामती ॲग्रो लि. साखर कारखाना समितीला भाडेतत्वावर दिला आहे. कारखान्यास करून दिलेल्या करारनामाप्रमाणे कामगारांना त्यांची घेणे असलेली पगाराची रक्कम अद्यापपावेतो दिली नाही. कामगारांचा भविष्यनिर्वाह निधीचा भरणाही केला नाही.

याबाबत राष्ट्रीय साखर कामगार संघ, चोपडा (इं.अ.), चोपडा शेतकरी सह. साखर कारखाना लि. चहार्डी यांनी याबाबत वेळोवेळी विनंती तक्रार अर्ज वरिष्ठांना दिली आहेत. शासन-प्रशासनास दखल घेण्यासाठी वारंवार आंदोलने, उपोषणे करुन जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीदेखील संचालक मंडळाने कोणतीही ठोस कार्यवाही पगाराबाबत व भविष्यनिर्वाह निधीच्या रक्कमेबाबत केली नाही.

संघटनेकडून राष्ट्रपती यांच्याकडेही ईच्छामरणाची विनंती करणारा अर्ज २० जानेवारी २०२४ला सादर केला आहे. त्याअनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनाही पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून वस्तूनिष्ठ चौकशी करुन तसा अहवाल दिला आहे. (latest marathi news)

सदरील वस्तुनिष्ठ चौकशी अहवालातील चौकशीत बारामती ॲग्रो लि. यांनी कारखान्यास करुन दिलेला करारानामा व इतर कागदपत्र सादर केली आहेत. त्यातील करून दिलेल्या करारनामातील अट क्रमांक एकनुसार परिच्छेदाचे अवलोकन केले असता, बारामती ॲग्रो लि. यांनी आपल्या करारनाम्यात नमूद केले आहे की, चोपडा साखर कारखान्याची सर्व देणी, जबाबदाऱ्या घेण्याची व रक्कमा देण्याची हमी घेत आहोत.

न्यायालयात जाण्याचा इशारा

कर्मचाऱ्यांचे थकीत पगाराची रक्कम व आमचा हक्काचा भविष्यनिर्वाह निधीची रक्कम देण्यापासून वंचित ठेवलेले दिसून येत आहे. त्यामुळे आमची थकीत पगाराची मागणी व भविष्यनिर्वाह निधीची मागणी रास्त असतानाही आम्हास वारंवार भुलथापा देवून वेळ मारून नेले जात आहे.

तरी सर्व कर्मचाऱ्यांच्या नावाने कारखानातील सर्व मालमत्तेवर बोजा बसविण्यात यावा, अन्यथा न्यायालयात धाव घ्यावी लागेल व येणारा गळीत हंगाम सुरू करू देणार नाहीत, असा इशारा संघटनेने दिला आहे. या निवेदनावर आनंदा सपकाळे, सुभाष पाटील, अमृत महाजन, लोटन पाटील, अशोक सोनवणे, निळकंठ पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकींनी कसा मिटवला शाहरुख-सलमानमधील वाद, 'त्या' पार्टीत नेमकं काय घडलं होतं?

Baba Siddique Political Career: बिहार जन्मभूमी तर मुंबई कर्मभूमी; राजकारणासह सिनेसृष्टीत बाबा सिद्दीकींनी कसा निर्माण केला दबदबा?

Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पकडलेल्या दोघांपैकी एक यूपी तर दुसरा हरियानाचा

CM on Baba Siddique: सिद्दीकी हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार; एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Baba Siddiqui: कार्यक्रमाला उपस्थिती, फटाके फोडताना साधला डाव, वाचा बाबा सिद्धिकींचा हत्येचा थरार!

SCROLL FOR NEXT