Tribal brothers celebrating in Bhongra market. esaka
जळगाव

Jalgaon Adivasi Bhongrya Fest: ‘आमरू होली आयो रे’; ‘भोंगऱ्या’चा बेधुंद उत्साह! उनपदेव, पाल येथे रंगीबेरंगी पोषाखासह आदिवासी नृत्य

Jalgaon News : आदिवासींच्या या भोंगऱ्या सणाला मंगळवारपासून (ता. १९) सुरवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

अडावद (ता. चोपडा) : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या उनपदेव पांढरी येथे आदिवासी बांधवांनी ‘आमरू होली आयो रे...’ म्हणत रंगीबेरंगी पोषाख परिधान करून तीर कमान, बिगुल, बासरी, ताट आदीसह ढोल वाजवीत आनंदोत्सव साजरा केला. आदिवासींच्या या भोंगऱ्या सणाला मंगळवारपासून (ता. १९) सुरवात झाली.

आदिवासीच्या पारंपरिक भोंगऱ्या बाजारात मंगळवारी (ता. १९) मोठी गर्दी झाली. आदिवासी बांधवांनी ढोलच्या गजरात नृत्य केले. या निमित्त बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. या वेळी आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते भोंगऱ्या (बोप) देवाचे पूजन करण्यात आले.

या वेळी शिवसेनेचे राजेंद्र पाटील, आदिवासी सेवक संजीव शिरसाठ, नामदेव पाटील, सचिन महाजन, पी. आर. माळी, हरिष पाटील, माजी सरपंच भावना माळी, विजिता पाटील, भारती महाजन, रंजना भोई, देवसिंग पावरा, उपसरपंच उषार देशमुख, प्रेमराज पवार, नरेंद्र पाटील, उमेश कासट, एम. के. शेटे, बी. के. साळुंखे, कालुसिंग पावरा, खुमसिंग महाराज, भाया पावरा, गजीराम पावरा आदी उपस्थित होते.

या वेळी अडावदचे सहय्यक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण, राजू थोरात, नासीर तडवी, सतीष भोई, भरत नाईक, सरीप तडवी, शुभव बाविस्कर, ज्ञानदेव सपकाळे, किरण शिरसाठ, प्रदीप पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

हार-कंगण, फुटाण्याचा प्रसाद

भोंगऱ्या बाजारात आदिवासी बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषा करीत बैलजोडीने बाजारात हजर होऊन आपापल्या ढोल-ताशासह महिला, पुरुषांनी बेधुंद नाचून आनंद साजरा केला. या वेळी हार- कंगण, फुटाण्याचा प्रसाद वाटण्यात आला. (latest marathi news)

पाल येथे हजारोंचा सहभाग

पाल (ता. रावेर) : सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या पाल येथेही होळी उत्सवानिमित्त भोंगऱ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील हजारोच्या संख्येने असंख्य आदिवासी पावरा समाजबांधवांनी पारंपरिक पोशाख परिधान करून उत्सवाचा आनंद लुटला.

या वेळी उत्सवात परिसरातील गाडग्याआम, शेंड्या अंजन, गारखेडा, निमड्या, पिंपरकुंड, सायबुपाडा, हरसिंगपाडा, गारबर्डी, सतापिपरी, हरणकुंड्या, या आदिवासी पाड्यातील समाजबांधवांनी ढोल-थाळी पथकासह सहभागी होऊन भोंगऱ्या उत्सवाच्या आनंद घेतला.

या निमित्ताने बाजारपेठेत मोठी उलाढाल दिसून आली. या वेळी ग्रामपंचायततर्फे चोख व्यवस्था व नियोजन करण्यात आले होते. तसेच पाल औट पोस्टचे पोलिस कर्मचारी कल्पेश आमोदकर, जगदीश पाटील, विष्णू भिल, मुकेश मेढे, होमगार्ड प्रवीण पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT