Dignitaries along with the winning contestants of the painting competition on Environment, Ground Water Recharge organized by Bharari Foundation and CREDAI. esakal
जळगाव

Jalgaon News : चित्रांमधून मांडले पर्यावरण, भूजल पुनर्भरणाचे महत्त्व! भरारी फाउंडेशन- क्रेडाईचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भरारी फाउंडेशन व क्रेडाई जळगाव यांच्यातर्फे झालेल्या चित्रकला स्पर्धेत तीनशेवर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानात झालेल्या स्पर्धेस आमदार सुरेश भोळे, क्रेडाईचे राज्य उपाध्यक्ष अनिश शहा, कंवरलाल संघवी, डॉ. पी. आर. चौधरी, क्रेडाई जळगावचे अध्यक्ष पुष्कर नेहेते, नीलेश पाटील, प्रवीण पाटील, अमोल ढोबळे, प्रवीण खडके उपस्थित होते. (Jalgaon Foundation initiative of CREDAI marathi news)

संस्थेचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी प्रास्ताविकात भूजल पुनर्भरण अभियानाबद्दल सांगितले. भूजल पातळी वाढवण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून, भूजल पुनर्भरण या विषयावर ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी चित्रकला अतिशय प्रभावी माध्यम असल्याचे अनिश शहा यांनी सांगितले.

अलीकडच्या काळात भूजल पुनर्भरण यंत्रणा बसविणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते झाडाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. योगेश पाटील, भक्ती कुलकर्णी, दिशा ठाकूर, कृष्णा सपकाळे यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. विनोद ढगे यांनी आभार मानले.

यशस्वितेसाठी सचिन महाजन, स्वप्नील वाघ, सागर पगारीया, हेमंत पाटील, अक्षय सोनवणे, अभिषेक बोरसे, सागर परदेशी, आकाश भावसार यांनी सहकार्य केले. विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक १००१ रुपये, द्वितीय पारितोषिक ७५१ रुपये, तृतीय पारितोषिक ५०१ रुपये, उत्तेजनार्थ २०१ रुपये, तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. (latest marathi news)

विविध गटांतील विजयी स्पर्धक

इयत्ता पहिली ते चौथी : गगन राहुल पाटील प्रथम, परी योगेश चोपडे द्वितीय, नयन समाधान देशमुख तृतीय, प्रणय भूषण सोनार चतुर्थ

इयत्ता पाचवी ते सातवी : चंचल गणेश काटोते, दिव्यश्री महेश बोरसे, पुष्कर लाडवंजारी

इयत्ता आठवी ते दहावी : संजीवन दिवाकर कळस्करे, निकिता देवराज पाटील, तुषार सचिन बिऱ्हाडे

खुला गट : समय अजय चौधरी, प्रणल राजेश मेहेरे, वास्तू नरेंद्र पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT