Smita Wagh, Karan Pawar esakal
जळगाव

Erandol Vidhansabha Constituency: वाढीव मतदानावर महायुतीसह आघाडीचाही दावा! एरंडोल मतदारसंघातील स्थिती; विधानसभेसाठीची चाचपणी

आल्हाद जोशी

Erandol Vidhansabha Constituency : एरंडोल विधानसभा मतदारसंघात २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष उमेदवारांना ७० हजारांच्यावर मताधिक्य मिळाले होते. यंदा झालेल्या निवडणुकीत दोन टक्के मतदान जास्त झाले असून, वाढलेल्या मतदानावर महायुती आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मताधिक्याचा दावा केला आहे. (jalgaon Erandol Vidhan Sabha Constituency aghadi vs mahayuti)

भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारात आमदार चिमणराव पाटील, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारात माजी मंत्री डॉ. सतीश पाटील सक्रिय सहभागी झाल्याने त्यांच्यादृष्टीने लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. आमदार चिमणराव पाटील हे भाजप उमेदवार स्मिता वाघ यांना किती मताधिक्य देतात, यावर विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरणार आहे.

एरंडोल विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६०.१८ टक्के मतदान झाले होते; तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ६१.७६ टक्के मतदान झाले आहे. वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होईल, हे मतमोजणीनंतरच समजेल. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत एरंडोल मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार उन्मेष पाटील यांना सुमारे ७४ हजारांचे मताधिक्य मिळाले होते.

ग्रामीण भागात नाराजीचा फटका

मात्र, या वेळी मतदारसंघात मुस्लिम समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदान, ग्रामीण भागात शेतकरी वर्गात असलेली नाराजी याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. मतदान केंद्रावर सकाळपासूनच मुस्लिम समाजाच्या मतदारांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले होते.

मतदारांच्या रांगा कुणाला लाभदायी!

सोशल मीडियावर मुस्लिम समाजाच्या मतदारांच्या रांगांचे छायाचित्र व फोटो व्हायरल होताच सायंकाळी मतदान केंद्रावर अचानक मतदारांच्या विशेषत: युवकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. युवकांसह युवतींच्याही अनेक मतदान केंद्रांवर लागलेल्या रांगा कोणत्या उमेदवारास धक्का देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (latest marathi news)

भाजपतील मतभेदांचा परिणाम

भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले अंतर्गत मतभेद पक्षासाठी डोकेदुखी ठरली होती. भाजपच्या एका गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अखेरच्या काही दिवसांत प्रचारात सहभाग घेतला होता. भाजपचे पदाधिकारी मतभेद बाजूला ठेवून अखेरच्या क्षणी प्रचारात सहभागी झाले होते.

दोघांचा पक्षप्रवे

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान माजी आमदार महेंद्रसिंह पाटील भाजपत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रा. मनोज पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार या दोघांचीही प्रचार यंत्रणा शिस्तबद्धपणे प्रचारात सहभागी झाल्याने मतदारसंघात निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार मतदारसंघातील स्थानिक असल्याने, तसेच शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख असताना त्यांनी मतदारसंघात सातत्याने केलेला संपर्क याचा त्यांना किती लाभ होईल, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. मतदारसंघात राम मंदिर, मोदी लाट याचा काही प्रमाणात प्रभाव दिसून आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT