Degraded temple of Goddess Durga. esakal
जळगाव

Jalgaon Navratri 2024 : दोन्ही गावांत एकाच देवीची घटस्थापना; बोरगाव येथे आठवड्याभर कीर्तन महोत्सवाचे आयोजन

Navratri : तालुक्यातील बोरगाव बुर्दक व खुर्द येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही दोन्ही गावे मिळून एकाच ठिकाणी दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

धरणगाव : तालुक्यातील बोरगाव बुर्दक व खुर्द येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही दोन्ही गावे मिळून एकाच ठिकाणी दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली आहे. गावे दोन अन्‌ देवी एक हे साधारण देवी स्थापनेचे २४वे वर्ष आहे. त्यामुळे दोन्ही गावांतील एकोप्याचे उदाहरण इतर गावांसाठी निश्‍चितपणे प्रेरणादायी आहे. बोरगावातील दिवंगत ग्रामस्थ सजन आनंदा सोनवणे यांच्या प्ररणेने चालत आलेल्या नवरात्र उत्सवानिमित जय दुर्गा माता उत्सव समितिने विविध कार्यक्रम, कीर्तन, दांडिया, लोकनाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. (Establishment of same goddess in both villages organizing week long kirtan festival at Borgaon )

या कीर्तन उत्सवात गुरुवारी (ता.३) रमेश महाराज सुसरीकर यांचे व शुक्रवारी (ता.४) राजेंद्र महाराज कासोदाकर यांचे तसेच शनिवारी (ता.५) गोविंद महाराज पाचोरेकर यांचे जाहीर कीर्तन झाले. रविवारी (ता.६) स्वप्निल महाराज गिरडकर यांचे कीर्तन होणार आहे. येत्या सोमवारी (ता.७) गावाची यात्रा व अनिता राणी अमळनेरकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. येत्या मंगळवारी (ता.८) प्रतिभा महाराज खेडगावकर यांचे कीर्तन, बुधवारी (ता.९) संध्या महाराज सुरतकर यांचे कीर्तन होईल. (latest marathi news)

दहा ऑक्टोबरला दांडिया, ११ ऑक्टोबरला डॉ. प्रवीण महाराज वैजापुरकर यांचे कीर्तन, १२ ऑक्टोबरला जनार्दनजी महाराज आरावेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. १३ ऑक्टोबरला महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. १४ ऑक्टोबरला देवी विसर्जन मिरवणुक आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी आयोजक जय दुर्गा मित्र मंडळ व बोरगाव बुद्रूक व खुर्द या दोन्ही गावांतील ग्रामस्थ पुढाकार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT