Former Guardian Minister Gulabrao Deokar speaking at NCP meeting on Thursday. Officials present on the stage. Activists present at the meeting in the second photo. esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त! राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा बैठकीत माजी मंत्री

Jalgaon : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव आणि रावेर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव आणि रावेर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने काम ने केल्याने पराभव झाला. यामुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करा. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना डच्चू देऊन सक्रिय कार्यकर्त्यांना पदे द्या, असा ठराव गुरुवारी (ता. २७) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा बैठकीत करण्यात आला. (executives of district were dismissed in district meeting of NCP )

येथील आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव व विधानसभेच्या तयारी या अनुषंगाने बैठक झाली. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, पक्ष निरीक्षक प्रसन्नजित पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील.

अल्पसंख्याक आघाडीचे एजाज मलिक, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील, अतुल पाटील, डॉ. मनोहर पाटील, मंगला पाटील, वंदना चौधरी, ज्योती पावरा आदी उपस्थित होते. श्री. गुजराथी, माजी मंत्री देवकर, डॉ. पाटील, निरीक्षक पाटील यांनी मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात सात ठिकाणी उमेदवार देऊ.

त्यात किमान पाच ठिकाणचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण, महानगर व तालुका स्तरावरील सर्व कार्यकारिणी तातडीने बरखास्त करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. पक्षाला नव्या जोमाने उभे करण्यासाठी डॉ. पाटील यांनी सूचना मांडली होती. (latest marathi news)

पक्षाचे निरीक्षक पाटील यांनी दोन्ही माजी मंत्र्यांच्या सूचनेचे स्वागत करून जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी तातडीने बरखास्त करीत असल्याची घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील सर्वच कार्यकारिणी नव्याने जाहीर होणार आहेत. या वेळी विधानसभा मतदारसंघनिहाय तालुका पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली.

माजी मंत्री डॉ. पाटील म्हणाले, की लोकसभेत राज्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात आपण दोन्ही जागा गमावल्या आहेत. त्या का गमावल्या, याचे परीक्षण करण्याची गरज आहे. आता झाले ते झाले. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळविण्यासाठी आपण तयारीला लागले पाहिजे. किमान पाच आमदार आपण पक्षाचे निवडून आणण्याचा निर्धार केला पाहिजे.

जिल्ह्यातून आमदार देण्याची ग्वाही देऊ : गुजराथी

माजी विधानसभा अध्यक्ष गुजराथी म्हणाले, की आगामी विधानसभा निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशी होणार आहे. त्यामुळे आपण सावध असले पाहिजे. आपण व आपला पक्ष कोणत्याही बाजूने झुकतोय, असे वाटता कामा नये. सर्व समाजाला घेऊन आपण जात आहोत, याची शाश्वती त्यांना आली पाहिजे. शरद पवार यांनी राज्यात सरकार आणण्याची ग्वाही दिली आहे. आपण त्यांना जिल्ह्यातून आमदार देण्याची ग्वाही देऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT