Animals destroying crops in farm fields. esakal
जळगाव

Jalgaon News : मोकाट जनावरांची शेतशिवारात नासधूस; शेतकरी हैराण

Jalgaon : पाऊस आतापर्यंत समाधान कारक झाला असल्याने शेतकरी समाधानी असून, पोटच्या पोराप्रमाणे शेतकरी पिकाला जीव लावून मशागत करीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरात शेकडो मोकाट जनावारांचा धुमाकूळ सुरू असून, सुमारे ३० ते ४० कळप शहराला लागून असलेल्या जामठी रस्ता, उजनी रोड, जामनेर रस्ता साळशिगी रस्ता, राजुरा रस्ता, शेलवड, जलचक्र, मनूर या गावाच्या रस्त्याने असलेल्या शेती शिवारात जावून नासधूस करीत आहेत. शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेती कसली जाते. या वर्षी पाऊस आतापर्यंत समाधान कारक झाला असल्याने शेतकरी समाधानी असून, पोटच्या पोराप्रमाणे शेतकरी पिकाला जीव लावून मशागत करीत आहे. (Farmers are shocked by destruction of lost animals in fields )

मात्र, मोकाट जनावरांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. शेतात महागाडे बी-बियाणे टाकून, खते फवारून मारून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने रान हिरवेगार केले आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने पीकही जोमदार येईल, अशी आशा आहे. परंतु मोकाट जनावरांच्या त्रासाला बळीराजा कंटाळला असून, हातचे पीक जाते की काय? अशा चिंतेत आहे.

सकाळी सहापासून ही मोकाट जनावरे शेती शिवारात कळपाने जातात आणि सायंकाळी पाचनंतर शेतात पीक तर खातात पण त्याची नासधूसही करतात. यासाठी काही शेतकरी फक्त आपल्या शेतातून गुरे हलविण्यासाठी दोनशे रूपये रोज मजुराला देत आहेत. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. जामनेर रस्त्यावर दोन्ही शैक्षणिक संस्था शाळा असून, या रस्त्यावरूनही मोकाट जनावरे कळपाने जातात. याचा त्रास विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागतो.

अनेक वेळा जनावरे हल्ल्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे घाबरून पळताना जनावरांच्या पायाखाली दाबले गेले तर विद्यार्थ्यांचा जीवही जावू शकतो. ज्येष्ठ नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. पशुपालक आपली जनावरे अशी मोकाट सोडतात. या समस्येबाबत वेळोवेळी तक्रारीही करण्यात आल्या आहेत. नगरपंचायत स्वमालकीची कोडवाड्याची जागा मलकापूर चौफुलीजवळ आहे. (latest marathi news)

त्यात जनावरे ठेवू शकत नाही. तरी नगरपंचायत प्रशासनाने ही जनावरे मोठ्या वाहनात भरून गोशाळेत जमा करावी अथवा गुरे ज्याच्या मालकीची आहेत, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. रात्री ही जनावरे जामठी दरवाजा, भुसावळ चौफुली, उजनी रोड, जुने तहसील परिसरात रस्त्यावर बसलेली असतात. यामुळे रहदारी प्रश्न उपस्थित होतो.

गुरांना हाकण्यासाठी आर्थिक भुर्दंड..!

शेतात महागाडे बी-बियाणे टाकून, खते फवारून मारून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने रान हिरवेगार केले आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने पीकही जोमदार येईल, अशी आशा आहे. परंतु मोकाट जनावरांच्या त्रासाला बळीराजा कंटाळला असून, हातचे पीक जाते की काय? अशा चिंतेत आहे.

सकाळी सहापासून ही मोकाट जनावरे शेती शिवारात कळपाने जातात आणि सायंकाळी पाचनंतर शेतात पीक तर खातात पण त्याची नासधूसही करतात. यासाठी काही शेतकरी फक्त आपल्या शेतातून गुरे हलविण्यासाठी दोनशे रूपये रोज मजुराला देत आहेत. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाने लागलीच याकडे लक्ष बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT