Field soil washed away due to heavy rainfall in Shiwar. Farmer giving a statement to Tehsildar Suchita Chavan. esakal
जळगाव

Jalgaon News : पिकांसह मातीही गेली वाहून! शेतकरी संकटात; धारागीर, पळासदड शिवारात अतिवृष्टी

Jalgaon : तालुक्यातील धारागीर, पळासदड शिवारात रविवारी (ता. २३) झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी, मक्यासह अन्य पिके वाहून गेल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील धारागीर, पळासदड शिवारात रविवारी (ता. २३) झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी, मक्यासह अन्य पिके वाहून गेल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतातील ठिबक नळ्या व अन्य शेतीचे साहित्य वाहून गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. महसूल प्रशासन व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार सुचिता चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. (farmers in trouble due to Soil washed away with crops in heavy rain )

धारागीर व पळासदड शिवारात रविवारी सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील पिके वाहून गेली आहेत. शेतात सर्वत्र पाणी झाल्यामुळे शेतीपयोगी साहित्याचे नुकसान होऊन शेतातील काळी माती देखील वाहून गेली असून, शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुक्यात खरीपाची पेरणी झाल्यानंतर पुरेशा प्रमाणावर पाऊस न पडल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.

रविवारी मध्यरात्री पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात होते. मात्र सकाळी शेतात गेल्यानंतर जोरदार पावसामुळे पिके व शेतीचे साहित्य वाहून गेल्याचे दिसताच शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला. पावसाचे व परिसरातील नाल्यांचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतांमध्ये खराडी निर्माण होऊन सर्वत्र केवळ दगड शिल्लक राहिले आहेत. (latest marathi news)

पावसामुळे शेताचे बांध देखील वाहून गेले आहेत. शिवारात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन त्यांना मानसिक धक्का बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्यासह तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेऊन नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.

या वेळी शेख आयुब शेख हुसेन, करण चौधरी, प्रकाश महाजन, यशवंत चौधरी, अल्ताफ शेख, गोकुळ महाजन, आबा पाटील, अण्णा ठाकूर, देविदास जोशी, अविनाश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

आमदारांना मदतीसाठी साकडे

शेतकऱ्यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्याशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. शासनस्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT