A big pothole lying on the road near Kajgaon Chauphuli on the National Highway. esakal
जळगाव

Jalgaon News : पारोळ्यात महामार्गावर जीवघेणा खड्डा; प्राधिकरणाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील शहरालगत राष्ट्रीय महामार्ग ५३ गेला आहे. मात्र या मुख्य रस्त्यावरील कजगाव चौफुलीलगत जीवघेणा खड्डा बऱ्याच दिवसांपासून पडला असून, याकडे महामार्ग प्राधिकरण हे लक्ष देत नसून यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नसून तत्काळ याबाबत खड्डा बुजविण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरालगत राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. ( Fatal potholes on highway in Parola neglected by authorities )

या महामार्गालगत महत्त्वपूर्ण कासोदा रोड, भडगाव रोड, कजगाव रोड, अमळनेर रोड, धुळे रोड असे रस्ते गेले आहेत. त्याच प्रमाणे या मुख्य रस्त्यावर बसस्थानक आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी व बसच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात असतात. तसेच कजगाव चौफुलीवरून चाळीसगावकडे तर या चौफुलीवरून शहरात येण्याचा मुख्य मार्ग आहे.

त्यामुळे या परिसरात वाहनधारकांसह ये-जा करणाऱ्यांचे मोठे प्रमाण आहे. असे असताना देखील या रस्त्यावरील भला मोठा खड्ड्याकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल सामाजिक संघटनांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, या रस्त्यावरून लोकप्रतिनिधींसह अनेक शासकीय अधिकाऱ्यांची वाहने ये-जा करतात. (latest marathi news)

तरीदेखील या महामार्गावरील खड्ड्याकडे आपसूकपणे दुर्लक्ष करून प्रवास करीत आहे. बऱ्याचदा या खड्ड्यांमुळे वाहनधारकांमध्ये ‘तू-तू मै-मै’ झाली आहे. तसेच याच चौफुलीवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. असे असताना देखील या खड्ड्याकडे कानाडोळा का होत आहे. हा प्रश्न वाहनधारकांसह शहरवासीयांना पडला आहे.

खड्डा तत्काळ बुजवा, अन्यथा...

राष्ट्रीय महामार्गावरील कजगाव चौफुली महत्त्वपूर्ण मानली जाते. मात्र त्याच चौफुलीवर रस्त्याच्या कडेला खड्डा पडल्यामुळे वाहनधारकांना कसरत करून वाहने न्यावी लागत आहेत. दरम्यान, याबाबत तत्काळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी लक्ष न दिल्यास सामाजिक संघटना रस्त्यावर येणार असल्याचे संघटना प्रमुख यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT