Tall fiber tents and towers erected by the forest department for tourists on the banks of the dam. esakal
जळगाव

Jalgaon Eco Tourism : गारबर्डी धरणावर पर्यटकांसाठी फायबर कुटी अन् मनोरे! नाशिक वन विभागाचा पुढाकार; पाल ‘इको टुरिझम’ला गती

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील पाल इको टुरिझमला गती देण्याचे काम वन्यजीव वन विभागाने हाती घेतले आहे.

सकाळ वृत्तसेवा

गणेश भोई : सकाळ वृत्तसेवा

पाल (ता. रावेर) : सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये गारबर्डी धरणाच्या काठावर वन विभागाने पर्यटकांसाठी फारबर कुटी अन् वन्य प्राण्यांना न्यायाळण्यासाठी व पक्षी निरीक्षणासाठी उंच मनोरे उभारले आहेत. जिल्ह्यातील पाल इको टुरिझमला गती देण्याचे काम वन्यजीव वन विभागाने हाती घेतले आहे.

पाल वन्यजीव वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार धन्वंतरी परिसरात पर्यटकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, पर्यटकांना आता जंगल सफारीसह निरीक्षणाचा मनमुराद आनंद मिळणार आहे. (Jalgaon Fiber huts for tourists at Garbardi Dam news)

यात दहा बाय दहाच्या फायबर कुटीत पंखा, लाईट, गॅलरी, खिडकी, सोलर प्लेट, रात्री मुक्कामाची व्यवस्था वन विभागाने केली आहे. या कुटीत तीन ते चार नागरिक आरामात राहू शकतात. मागील सहा महिन्यांपासून या वनक्षेत्रात पर्यटकांना चालना देण्यासाठी कामे सुरू झाली आहेत.

पाल अभयारण्य समृद्ध वनदर्शनाबरोबरच आदिवासी संस्कृतीची ओळख देणारे, त्यांचे जीवनमान आणि उत्सव यांचा मनमुराद आनंद देणारे असे स्थळ आहे. दाटीवाटीने उभी राहिलेली झाडे आणि खानदेशासाठी पाऊस अडविणारी सातपुडा पर्वत रांग डोळ्यांचे पारणे फेडत या वनसंपदेला अंगाखांद्यावर खेळवितांना दिसते.

त्यामुळेच हा अभयारण्य पर्यटकांना खुणावत राहतो. गारबर्डी धरणस्थळी प्रादेशिक वन विभागाने फायबर टेन्ट तयार केले आहेत. या ठिकाणी या कुटीजवळून धरण परिसरातील निसर्गरम्य दृश्ये पावसात पाहायला मिळतील. सलग एक महिना काम करून ही फायबर टेन्ट कुटी वन्यजीव नासिक वन विभागाने पाल परिसरात तयार केली आहे. या फायबर कुटीजवळच पर्यटक जेवण तयार करून या वनपर्यटनाचा मनमुराद आनंद घेऊ शकतात.

हे क्षेत्र अतिशय सुंदर असून, ज्यांना वन्यजीव पाहायचे आहेत, त्यांच्यासाठी, ज्यांना पक्षी पाहायचे आहेत, त्यांच्यासाठी आणि ज्यांना वाघ पाहायचा आहेत, त्यांच्यासाठीही हे अभयारण्य एक आकर्षणाचे ठिकाण आहे. सुकी धरणाच्या आसऱ्याला वन्यजीव येतात. रानपिंगळ्याबरोबर गरूड, सुतार या पक्ष्यांसह दोनशेहून अधिक प्रजातींचे पक्षी आपण येथे पाहू शकतो. पट्टेदार वाघाचा वावर आणि बिबट्याचे होणारे दर्शन अंगावर रोमांच उभे करतात.

अस्वल, कोल्हा, लांडगा, रानकुत्रा, रानडुक्कर, रानमांजर, चिंकारा, हरीण, चितळ, चौशिंग्या, सांबर आणि नीलगायीही आपल्याला नजरेस पडतात. साग, अंजनासोबत ऐन, शिसव, तिवस, पिपळ, निंब, धावडा, खैर, हिरडा, बेहडा, तेदूंच्या झाडांची गर्दी मनाला सुखावून जाते. या वनामध्ये बांबूही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. (Latest Marathi News)

चहूबाजूंनी न्याहाळता येणार सौंदर्य

पावसाळ्यात तर पर्वतरांगांमध्ये विसावणाऱ्या ढगांनी सातपुड्यावर धुक्याची दुलई पांघरली आहे की काय असे वाटू लागते. गारबर्डी धरण चहूबाजूंनी पाहण्यासाठी तथा पर्यटकांना धरण सरोवराचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पाच फायबर टेन्ट व उंच मनोरे बसविण्यात आले आहे.

या ठिकाणी आतापर्यंत कोणी भेट दिली नसून यांनी संपूर्ण परिसर पाहण्याची सोय झाली आहे. या परिसरात विकास आराखड्यांतर्गत सातत्याने विकास कामे केली जात आहे. या ठिकाणी विविध पॉइंटवरून जंगल व पाण्याचे नैसर्गिक सौंदर्य न्यायाळण्यासाठी सोय करण्यात आली आहे.

"संपूर्ण परिसर पाहण्याची एका ठिकाणाहून न्याहाळण्याची सोय फायबर टेन्टमुळे आता झाली आहे. धरण काठावर फायबर टेन्ट व उंच मनोरे पर्यटकांसाठी उभारले आहेत. अजून या परिसरात कामे बाकी असून, काही दिवसांत कामे पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांसाठी खुले करण्यात येईल."- अमोल चव्हाण, वन्यजीव वनक्षेत्रपाल, पाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: PM मोदींचा एक निर्णय अन् टाटांचा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड; 73 टक्के स्वस्त मिळतोय शेअर

Air Pollution : नाशिकचा वायू गुणवत्ता निर्देशांकात वाढ; वायू प्रदूषित शहरांच्या यादीत 113 स्थानावर

IPL 2025 Auction: विदर्भाच्या पाच खेळाडूचं नशीब फळफळलं, मिळाली मोठी किंमत; पण उमेश यादव 'अनसोल्ड'

Winter Care : हिवाळ्यात मुले सतत सर्दी, आणि खोकल्यानी आजारी पडतात का? तर या ४ हेल्दी पदार्थ बनवून खाऊ घाला.

"Love You" म्हणत अनुषाने भूषणच्या वाढदिवशी दिली प्रेमाची कबुली ? नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT