भुसावळ : दीपनगर येथील नवीन ६६० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पात गॅस मशिनने कटिंगची कामे सुरू असताना, आगीचा भडका उडून दोन मजूर भाजले गेले. ही घटना शनिवारी (ता. ५) सायंकाळी घडली. महानिर्मिततीने काम दिलेल्या भेल कंपनीच्या एका उपकंत्राटदार कंपनीकडे दोन्ही मजूर रोजंदारीने कामाला होते. प्रकल्पात गॅस कटींग सुरू असताना, शॉर्टसर्किट झाल्याने फुलगाव येथील कामगार दीपक बावस्कर व परप्रांतीय कामगार अमितकुमार भाजले गेले. (Gas cutter machine caught fire 2 contract workers were burn )
दुर्घटनेत दोघे सुमारे दहा ते १५ टक्के भाजले आहेत. शनिवारी (ता. ५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. जखमी दीपक बावस्कर, अमितकुमार यांना भुसावळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना दुसऱ्या दिवशी दुपारी जळगावला हलविण्यात आले.
''दीपनगर औष्णिक वीज केंद्रात कंत्राटी कामगारांचे गॅस कटिंगचे काम सुरू असताना, आगीचा भडका उडून फुलगाव येथील कामगार दीपक बावस्कर, परप्रांतीय कामगार अमितकुमार दोघे भाजले. दोघांची तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट घेऊन जबाब नोंदविले आहेत. या घटनेची चौकशी सुरू आहे. अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.''- महेश गायकवाड, पोलिस निरीक्षक, तालुका पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.