Fire damage to Sridutta Hardware shop. esakal
जळगाव

Jalgaon Fire Accident : शॉर्टसर्किटने दुकानाला आग; साडेबारा लाखांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fire Accident : शॉर्टसर्किटने रंगांच्या व प्लायवूडच्या दुकानाला आग लागून सुमारे साडेबारा लाखांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी (ता. १३) सकाळी धुळे रोडवरील बाजार समितीजवळ घडली. अग्निशमन दलाने वेळीच आग विझविल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, अन्यथा शेजारील दुकानांनाही आग लागली असती. शुभम पवार यांच्या श्रीदत्त हार्डवेअर दुकानाला आग लागल्याची माहिती सकाळी एक अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिली. (Fire Accident Short circuit caused loss of twelve lakhs to shop )

पवार यांनी दुकान उघडून ताबडतोब अग्निशमन दलाला पाचारण केले. त्याठिकाणी विद्युत प्रवाह सुरू असल्यामुळे वायरमन आकाश वाडीले यांनी वीजपुरवठा बंद केला. आगीचे प्रमाण इतके भयानक होते, की दुकानातही प्रवेश करता येत नव्हता. अग्निशमन दलप्रमुख दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, भिकन पठाण, आनंदा झिंबल, मच्छिंद्र चौधरी यांनी तातडीने आग विझविल्याने आजूबाजूच्या दुकानांना आग लागली नाही. (latest marathi news)

मात्र, पवार यांच्या दुकानातील सर्व ऑईलपेंट, रंग तयार करण्याचे मशीन, सर्व प्लायवूड जळून खाक झाले होते. शुभम पवार यांचे सुमारे साडेबारा लाखांचे नुकसान झाले आहे. पवार यांचा विमा नसल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शॉर्टसर्किटमुळे रात्री दोनच्या सुमारास आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT