Firefighters and villagers extinguishing house fires. esakal
जळगाव

Jalgaon Gas Leak : गॅसगळतीने आगीचा भडका; 3 घरे भक्ष्यस्थानी; जीवितहानी टळली

Jalgaon News : करणखेडा (ता. अमळनेर) येथील गावात गॅसगळतीने आगीचा भडका होऊन एकापाठोपाठ तीन घरांना आग लागली.

सकाळ वृत्तसेवा

कळमसरे : करणखेडा (ता. अमळनेर) येथील गावात गॅसगळतीने आगीचा भडका होऊन एकापाठोपाठ तीन घरांना आग लागली. ही घटना बुधवारी (ता. १०) सकाळी दहाच्या सुमारास घडली. या आगीमुळे दोन घरे पूर्णतः खाक झाली. एका घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दोन कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. करणखेडा येथे बापूराव राजधर धनगर यांच्या पत्नी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना गॅस पेटविताच अचानक आगीचा भडका झाला. (Jalgaon Fire breaks out due to gas leak)

काही कळण्याच्या आतच त्या सतर्कतेने लागलीच घराबाहेर पडल्या. त्यांनी घराबाहेर पडत आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धावत येत आग विझविण्याचा प्रयत्न केला. घर माती तसेच लाकडाचे असल्याने संपूर्ण घराने पेट घेतला. घराचे छत लाकडी असल्याने त्याने लवकर पेट घेतला. ग्रामस्थांनी समयसूचकता दाखवत शेजारील घरांना आग लागू नये, म्हणून धाब्यावर जाऊन खोदण्यास सुरवात केली.

तोपर्यंत शेजारील आसाराम राजधर धनगर, सुनील आत्माराम गुरव यांच्याही घराला आग लागल्याने मोठी धावपळ उडाली. शरद धनगर यांनी त्वरित नगर परिषदेला फोन करून आगीचे वृत्त कळवताच अग्निशमन बंब करणखेडा येथे पोचला. अग्निशमन दलप्रमुख दिनेश बिऱ्हाडे, वाहनचालक फारुख शेख, फायरमन मच्छिंद्र चौधरी, वासीम पठाण यांनी आग विझविली. (latest marathi news)

बापू धनगर व आसाराम धनगर यांच्या घरातील कपडे, फ्रीज, टीव्ही तसेच घरगुती साहित्य खाक झाले. घराचे धाबे खोदल्याने त्यांना राहायला जागादेखील राहिली नाही. तसेच सुनील गुरव यांनी त्यांचे घर स्वस्त धान्य दुकानदाराला धान्य ठेवण्यासाठी दिले होते. त्याही घराला आग लागल्याने सर्व धान्य जळून खाक झाले. मंडलाधिकारी सुरेश चौधरी, तलाठी संगीता भोसले यांनी पंचनामा केला. गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही भेट देऊन पाहणी केली.

आगीमुळे दोन कुटुंबे उघड्यावर

ज्या घराला आग लागली, ते घर व आजूबाजूला असलेली घरे माती व लाकडाची असल्याने संपूर्ण नुकसान झाले. त्यामुळे यातील दोन घरांचे संपूर्ण नुकसान झाल्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.

ही घटना मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांना कळताच त्यांनी तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्याशी संपर्क साधून आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी आचारसंहितेची अडचण येत नसल्याने उद्ध्वस्त कुटुंबांना तातडीने घरकुल मंजूर करावे आणि एक महिन्याचा किराणा द्यावा, अशी सूचना केली. आगीत तिन्ही घरे मिळून सुमारे तेरा लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, या आगीत संसारोपयोगी साहित्य जळाल्याने दोन्ही कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT