ST officials and staff expressing happiness by bursting firecrackers in the bus station premises. esakal
जळगाव

Jalgaon News : राज्यात स्वच्छ, सुंदर बसस्थानकात चोपडा अव्वल; 50 लाखांचे पहिले बक्षीस जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत ‘अ’ वर्गात राज्यात चोपडा बसस्थानकाने १०० पैकी ८३ गुण प्राप्त करीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. बसस्थानकाला ५० लाखांचे बक्षीस बुधवारी (ता. २६) जाहीर करण्यात आले. प्रादेशिक स्तरावरही हे बसस्थानक अव्वल ठरले असून, दहा लाखांचे बक्षीस मिळविले आहे. ( First prize of 50 lakhs announced for top Chopda in clean bus station)

येत्या १५ ऑगस्टला हा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून डीजेच्या तालावर जल्लोष केला. ता. १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या काळात एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे- स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबविले गेले.

ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली होती. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबविण्यात आलेल्या या अभियानात स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेत बागबगीचा, वृक्षारोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांवर वॉटर कूलर, घड्याळ, सेल्फी पॉइंट ही कामे करण्यात आली.

याबरोबरच प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा, बसच्या स्वच्छतेबरोबरच त्यांची तांत्रिक दुरुस्ती- देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळ्या सर्वेक्षण समित्यांच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यात बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते. (latest marathi news)

पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटात तीन क्रमांक काढण्यात आले. प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या बसस्थानकाला राज्यस्तरावरील अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. त्यातून सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या चोपडा बसस्थानकाची राज्यात प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली असून, ५० लाखांचे बक्षीस मिळाले आहे.

बक्षिसाची रक्कम सोयी-सुविधांसाठी...

मिळालेल्या ५० लाखांच्या बक्षिसातून राज्य परिवहन महामंडळ ठरवून देईल, त्या पद्धतीने कामे होतील. यात कर्मचारी तसेच प्रवासी यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जातील. एकही रुपया वायफळ खर्च होणार नसल्याचे आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी सांगितले. या वेळी पत्रकार परिषदेत वरिष्ठ लिपिक डी. डी. चावरे, आगार लेखाकार योगराज पाटील, वाहतूक नियंत्रक संजय सोनवणे, चंद्रभान रायसिंग, वाहतूक निरीक्षक नितीन सोनवणे, सागर सावंत, अतुल पाटील, श्‍याम धनगर, दीपक पाटील, भगवान नायदे, नरेश जोशी, नाना बाविस्कर उपस्थित होते.

''इतिहासात प्रथमच बस आगाराला एवढे मोठे ५० लाखांचे बक्षीस मिळाले आहे. यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला. बसस्थानकात प्रवाशांनी खूप सहकार्य केले. बसस्थानक आणि परिसरात जे काम आम्ही या ठिकाणी केले, ते प्रवाशांच्या हितासाठी केले आहे. यापुढही आम्ही करीत राहू. आजच्या बक्षिसाने आम्हाला मोठी प्रेरणा मिळणार आहे. पुढे अधिक जोमाने काम करू. माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. अनेकांनी यासाठी सहकार्य केले असून, त्यांचा मी ऋणी राहील.''- महेंद्र पाटील, आगार व्यवस्थापक, चोपडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT