Zilla Parishad Chief Executive Officer Ankit while inquiring about gastro patients at Primary Health Centre. esakal
जळगाव

Jalgaon News : मोठा वाघोद्यात CEO सह 25 अधिकाऱ्यांचा ताफा! ‘गॅस्ट्रो’ रुग्ण असलेल्या परिसराची पाहणी; डॉक्टरांना सूचना

सकाळ वृत्तसेवा

सावदा (ता. रावेर) : मोठा वाघोदा येथील ‘गॅस्ट्रो’चे संक्रमण झालेल्या प्रभाग व परिसरातील पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन भायेकर, फैजपूरच्या प्रांताधिकारी देवयानी यादव, तहसीलदार बंडू कापसे, गटविकासाधिकारी दीपाली कोतवाल, तालुका आरोग्याधिकारी डॉ. अजय रिंढे यांच्यासह जिल्हाभरातील २५ अधिकाऱ्यांनी केली व समस्या जाणून घेतल्या. चिनावल प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णांची चौकशी केली. (Jalgaon motha Waghodya Inspection of premises with gastro patients)

वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते उपचार करण्याचे सांगितले. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्याने मोठा वाघोद्यात आरोग्य विभागाने गॅस्ट्रोची साथ घोषित केली. २० मेस घेतलेले पाणी तपासणी नमुने दूषित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. २०१७ मध्येही त्याच प्रभागात डायरियाची साथ पसरली होती.

आताही उपरोक्त परिसरातील नागरिकांना गॅस्ट्रोचे रुग्ण आढळल्याने घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पाणीपुरवठा पाइपलाइन लिकेज झाल्यामुळे गॅस्ट्रोचे २१मेस २७, तर २२ मेस ११ रुग्ण आढळले होते. गुरुवारी (ता. २३) सकाळपासून दुपारी एकपर्यंत ८ नवीन रुग्ण चिनावल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले आहेत. (latest marathi news)

आणखी रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते? आरोग्य विभागाने विविध भागातून पाणी तपासणी नमुने तपासले असता, ४ ते ५ पाणी नमुने दूषित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. नंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे. गॅस्ट्रो परिसरात सध्या पाइपलाइनद्वारे पुरवठा बंद करून टँकरद्वारे शुद्ध पाणी पुरविण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अंकित यांनी दिले.

या प्रकाराची समितीमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. परिसरातील नागरिकांनी नवीन पाइपलाइन, नवीन गटारी आदी समस्या जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. अंकित यांच्यासमोर मांडल्या. तत्पूर्वी त्यांनी गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्यांना लक्षणे जाणवत असतील, त्यांनी तत्काळ आरोग्य केंद्रात दाखल व्हावे आणि आरोग्य यंत्रणेने आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT