crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ जबरी रस्ता लूट! वाहनावर दगड मारून व्यावसायिकास लुटले

Crime News : व्यावसायिकास खाली उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावल्याची घटना मंगळवारी (ता. ३०) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जळगाव-ममुराबाद रेाडवरील लेंडीनाला पुलाजवळील छत्रपती शिवाजीनगरात स्मशानभूमीजवळ पीकअप वाहनासमोरील काचावर दगड मारत वाहन अडविले. व्यावसायिकास खाली उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावल्याची घटना मंगळवारी (ता. ३०) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. (Forced Road Robbery near Shivaji Nagar)

मेहरुण परिसरातील रामनगरमधील कासीम अब्दुल रहीम खाटीक (वय ४४) शेळ्या आणि बोकड खरेदी-विक्री करतात. मंगळवारी रात्री साडेअकराच्या त्यांच्या मालकीच्या पीकअप (एमएच ५०- ५२२०)मधून बाहेरगावाहून परतत असताना, शिवाजीनगरातील स्मशानभूमीजवळ अज्ञात चौघांनी त्यांच्या वाहनावर दगड फेकून मारला.

अचानक झालेल्या हल्ल्याने कासीम खाटीक भांबावले. वाहनाचा वेग वाढवणार इतक्यात एका लुटारूने गाडीत हात घालून त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. घडल्या प्रकाराने भयभीत झालेल्या कासीम शेख यांनी बुधवारी (ता. ३१) पोलिस ठाणे गाठले व घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. शहर पेालिसांनी चौकशी अंती अज्ञात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक फौजदार सुनील पाटील तपास करीत आहेत.

नेहमीचा ‘स्पॉट’

शिवाजीनगर स्मशानभूमीजवळील जागा लुटमारीचा ‘स्पॉट’ बनला आहे. शिवाजीनगर ‘ग्रेव्ह यार्ड’कडून रेल्वेरूळाला समांतर रोड स्मशानभूमीजवळ वळण घेतो. तेथून कब्रस्तानाजवळून वळण घेत नाल्याचा पूल आणि ममुराबाद रोड, असा एस आकाराचे वळण असल्याने, तसेच या मार्गावर रहदारी कमी व अंधार असल्याने लुटारूंचे फावते. परिणामी, ठरावीक दिवसानंतर लुटमार, हामणारीचे प्रकार घडण्याचे हे ठिकाण बनले आहे. याच ठिकाणी माजी महापौरांच्या मुलाचा खून करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर रेल्वेरूळ ओलांडून संशयित फरारी होतात.

सीसीटीव्ह हवेत...

पोलिसांनी ममुराबाद पूल, मुस्लिम कब्रस्तान, स्मशानभूमी आणि शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांगल्या प्रतिचे कॅमेरे लावल्यास या घटनांना पायबंद घालता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: ५ लाख द्या, EVM हॅक करून जिंकून देतो, अन्यथा... ठाकरे गटाच्या उमेदवाराला धमकी

Salman Khan: सलमानला धमकी; बिष्णोईला कर्नाटकमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

आजचे राशिभविष्य - 7 नोव्हेंबर 2024

Indian Railway: भारतीय रेल्वेने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडलाही टाकले मागे, अनोख्या विक्रमाला गवसणी

Sakal Podcast: आता एका क्लिकवर १०८ रुग्णवाहिका पोहोचणार ते निवडणुकीत ‘धोतराची’ परंपरा खंडित

SCROLL FOR NEXT