Former MLA Mahendrasingh Patil while expressing his thoughts in the gathering. esakal
जळगाव

Jalgaon BJP News : माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांचा ‘भाजप’त प्रवेश! महाविकास आघाडीला धक्का

सकाळ वृत्तसेवा

एरंडोल : एरंडोल मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष महेंद्रसिंह पाटील यांनी शुक्रवारी (ता. १०) असंख्य समर्थकांसह जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, माजी खासदार ए. टी. नाना पाटील, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा देवयानी ठाकरे, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानास केवळ दोन दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. (Jalgaon Former MLA Mahendra Singh Patil joins BJP)

हिमालय मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. १०) भाजप आणि माजी आमदार महेंद्रसिंह पाटील समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. मेळाव्यात माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीनुसार काम पूर्ण झाले असून, वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या गावांचे पुनर्वसन न झाल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा करण्यात येणारी अडचण, तसेच पद्मालय क्रमांक दोनचे रखडलेले काम या विषयावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी कासोदा, आडगाव येथे सभा घेतल्या होत्या.

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भाजपच्या पदाधिकारी तथा महेंद्रसिंह पाटील यांच्या भगिनी देवयानी ठाकरे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची विनंती केली होती. आमदार मंगेश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यातही संपर्क साधून माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्याशी चर्चा घडवून आणली. (latest marathi news)

लोकसभा निवडणुकीनंतर मुंबई येथे बैठकीचे आयोजित करून एरंडोल मतदार संघातील अंजनी प्रकल्प, पद्मालय प्रकल्प दोन, यासह रखडलेल्या प्रकल्पांच्या कामांना गती देऊन मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांना देऊन तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा, असे आवाहन केल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी १९७७ आणि १९९५ असे दोन

वेळेस मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले असून, पंचायत समितीचे सभापती, धरणगाव बाजार समितीचे अध्यक्ष, शेतकी संघाचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य यासह विविध संस्थांवर नेतृत्व केले आहे. माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्या प्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मेळाव्यास पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT