Toll  esakal
जळगाव

Jalgaon News: 20 किलोमीटरच्या आतील स्थानिकांना टोल माफी : माजी खासदार ए. टी. पाटील; टोल अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर निर्णय

Latest Jalgaon News : या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी ए. टी. पाटील यांनी भाजपच्या कार्यालयात बुधवारी (ता. १८) पत्रकार परिषद घेऊन झालेल्या निर्णयाची माहिती देऊन स्थानिक रहिवाशांनी आधारकार्ड व आर. सी. बुक दाखवून मार्गक्रमण करावे असे आवाहन केले.

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी २० किलोमीटर आतील स्थानिक रहिवाशांना टोल माफी केल्याचे सांगितलेले असतानाही येथील सबगव्हाण टोल नाक्यावर स्थानिक रहिवाशांसह प्राध्यापक, डॉक्टर, व्यापाऱ्यांना धुळे जाण्यासाठी टोल देऊन ये- जा करावी लागत होती. या अडचणीसंदर्भात माजी खासदार ए. टी. पाटील यांच्याकडे कैफीयत मांडल्यानंतर श्री. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार, वीस किलोमीटरच्या आतील स्थानिकांना टोल माफी करण्यात आली असल्याचे ए. टी. पाटील यांनी सांगितले. (Toll Waiver to Locals within 20 KM)

या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी ए. टी. पाटील यांनी भाजपच्या कार्यालयात बुधवारी (ता. १८) पत्रकार परिषद घेऊन झालेल्या निर्णयाची माहिती देऊन स्थानिक रहिवाशांनी आधारकार्ड व आर. सी. बुक दाखवून मार्गक्रमण करावे असे आवाहन केले.

पत्रकार परिषदेला टोल व्यवस्थापक नरेंद्र खैरनार, शरद चौधरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. अतुल मोरे, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, सरचिटणीस सचिन गुजराथी, माजी तालुका चिटणीस धीरज महाजन, विनोद हिंदूजा, भावडू राजपूत, समीर वैद्य, डॉ. सचिन बडगुजर, प्रा. डॉ. संजय भावसार, व्यापारी दिनेश गुजराथी आदी उपस्थित होते.

माजी खासदार पाटील यांनी सांगितले, की चार महिन्यांपासून स्थानिक रहिवाशांना धारकांना टोल माफ व्हावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू होते. राष्ट्रीय महामार्गाचे जनरल मॅनेजर शिवाजी पवार तसेच टोल प्रोजेक्ट मॅनेजर लतीफ शेख यांच्याशी देखील या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनांच्या अधीन राहून निर्णय होईपर्यंत २० किलोमीटरच्या आतील स्थानिक रहिवासी, डॉक्टर, वकील व व्यापाऱ्यांना आधारकार्ड व वाहनाच्या आर. सी. बुकच्या आधारे टोल माफी देण्याला मान्यता दिली आहे. (latest marathi news)

या संदर्भातील सूचना संबंधित टोल नाका व्यवस्थापकांना देखील मिळाल्या आहेत. त्यामुळे २० किलोमीटर आतील स्थानिक रहिवाशांना यापुढे टोल लागणार नाही असे श्री. पाटील यांनी सांगून या निर्णयाची आजपासूनच अंमलबजावणी होत असल्याचे सांगितले.

आधार कार्ड, आर. सी. बुक सोबत ठेवा

या संदर्भात माहिती देताना टोल नाका व्यवस्थापक नरेंद्र खैरनार यांनी सांगितले, की २० किलोमीटरच्या आतील स्थानिक रहिवाशांनी आपल्या दुचाकी, चार चाकी वाहनासोबत स्वतःचे आधारकार्ड व वाहनाचे आर. सी. बुक सोबत ठेवावे. टोल नाक्यावरील कर्मचारी खात्री करूनच अशा वाहनधारकांना विना टोल जाऊ देतील असे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT