Fraud Crime esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : पतीच्या निधनानंतर विमा पॉलिसीचे 11 लाख हडप करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : एखाद्या कुटुंबाला आजारपण अथवा मृत्यूनंतर हातभार लागावा, या हेतूने विमा पॉलिसी काढल्या जातात. हाच मुद्दा पटवून विमा प्रतिनिधी आपापले उद्दिष्ट पूर्ण करतात व संबंधित पॉलिसीधारकांना सेवा देत असतात. मात्र, जळगाव जिल्ह्यातील कंजरवाडा येथील विमा प्रतिनिधीने एका पॉलिसीधारकाच्या निधनानंतर मिळालेल्या रकमेतील ११ लाख रुपये विधवा महिलेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन हडप केल्याची घटना घडली आहे. ( embezzled 11 lakhs of insurance policy after death of her husband )

याप्रकरणी संबंधित विमा प्रतिनिधीवर गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की मांडवेदिगर (ता. भुसावळ) येथे भाईदास छगन पवार, पत्नी लाचाबाई कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. हयात असताना, त्यांनी शशिकांत दिलीप बागडे (रा. कंजरवाडा, जळगाव) यांच्याकडून १० जानेवारी २०१३ ला विमा पॉलिसी काढली होती. त्यासाठी ते दरवर्षी आकारलेली रक्कम सातत्याने भरत होते.

पॉलिसीची मॅच्युरीटी झाल्यानंतर ११ लाख किंवा मुदतीआधीच मृत झाल्यास ११ लाख रुपये मिळणार, असे ठरले होते. पॉलिसीची मॅच्युरिटी पूर्ण होण्यापूर्वीच भाईदास पवार यांचे २१ नोव्हेंबर २०२३ ला निधन झाले. त्यामुळे पॉलिसीची रक्कम मिळावी, यासाठी लाचाबाई पवार यांनी सर्व कागदपत्रे जमा करून बँकेत खाते उघडले. त्यानंतर त्यांच्या खात्यात पॉलिसीचे ११ लाख रुपये १७ जानेवारी २०२४ ला जमा झाले होते.

लाचाबाई यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत विमा एजंट शशिकांत बागडे याने पैसे जमा होताच त्याच दिवशी ५ लाख रुपये आणि २५ जानेवारीला १ लाख, अशी रक्कम आयएमपीएसच्या माध्यमातून समृद्धी प्रॉपर्टीज या कंपनीच्या अकाऊंटवर वळती केली, तसेच १८ जानवोरीला ५ लाख रुपये शशिकांत बागडे याने त्यांच्या ओळखीचे विशाल पाटील यांच्या बँक खात्यात वर्ग केले.

घडल्या प्रकारानंतर लाचाबाई यांनी बँकेत जाऊन चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. त्यांनी शशिकांत बागडे याला विचारणा केली असता, त्याने १ लाख रुपये दिले आणि उर्वरित रक्कम दहा लाख रुपये थोड्या दिवसांत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तो सारखा टाळाटाळ करून पिटाळून लावत होता.

परिणामी, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत लाचाबाई यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी चौकशीअंती याप्रकरणी गुरुवारी (ता. २७) शशिकांत बागडे, विशाल पाटील आणि समृद्धी प्रॉपर्टीचे खातेधारक यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील तपास करीत आहेत.

पॉलिसी एजंटचा समूह

एखाद्याची विमा पॉलिसी काढून त्या पॉलिसीची रक्कम लाटण्याचे काम करणारा समूह कंजरवाड्यात असल्याचे साधारण दहा वर्षांपूर्वी उघडकीस आले होते. खासगी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह काही एंजटवरही तेव्हा गुन्हे दाखल करण्यात आले होते. निराधार, निरागस लोकांच्या नावे पॉलिसी काढून त्यांचा पैसा लाटणारा समूह जळगाव शहरात कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT