Fraud Crime esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : सासू-शालकाची जीवन संपवण्याची धमकी; न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा दाखल

Crime News : न्यायालयाच्या आदेशानंतर संशयित शालक अजय डोळे, सासूबाई मालती चिंधू डोळे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : शालकासह सासूने जावायाकडून ५ लाख रुपये घेऊन ऐशो आराम केला. जावायाने पैशांसाठी तगादा लावला असता, शालकाने मी शाळेतून राजीनामा देऊन माझ्या जीवाचे बरेवाईट करून देण्याची धमकी दिली. अखेर चंद्रकांत नारायण वानखेडे (वय ५१, रा. राका पार्क) यांनी न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर सुनावणी झाली. न्यायालयाच्या आदेशानंतर संशयित शालक अजय डोळे, सासूबाई मालती चिंधू डोळे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (Jalgaon Fraud Crime Mother in law threatened to end her life case of fraud filed by court order marathi news)

राका पार्कमधील चंद्रकांत वानखेडे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नोकरीला आहेत. जुलै २०१६ मध्ये वानखेडे यांचा शालक व सासूने तीन महिन्यांत परत करण्याच्या मुदतीवर त्यांच्याकडे पाच लाख रुपये मागितले. वानखेडे यांनी कर्मचाऱ्यांच्या पतपेढीतून कर्ज काढून त्यांना पाच लाख दिले.

तीन महिन्यांनंतर वानखेडे यांनी शालक अजय डोळे याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. पैशांसाठी तगादा वाढल्याने डोळे याने ५० हजारांचे दोन चेक त्यांना दिले होते. मात्र, त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने ते दोघ चेक बाऊन्स झाले. (latest marathi news)

वानखेडे यांनी शालक अजय डोळे याला वकिलामार्फत नोटीस पाठविली. त्यावर ‘मी शाळेतून राजीनामा देऊन टाकतो आणि माझ्या जीवाचे बरे वाईट करू न घेईल’, अशी धमकी अजय डोळे याने दिली. संशयित शालकासह सासूकडून धमकी मिळत असल्याने वानखेडे यांनी दिलेल्या माहितीवरून रामानंदनगर पोलिसांत त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली.

तक्रारदार वानखेडे यांनी विधी सेवा केंद्रात दाद मागून तडजोडीसाठी पत्रव्यवहार केला. मात्र, संशयित त्याठिकाणी उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून अजय डोळे (रा. भुसावळ) व त्याची आई मालती डोळे (रा. भालोद, ता. यावल) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Manifesto 2024: भाजपच्या जाहीरनाम्यात 'विकसित महाराष्ट्र' संकल्पना; शेतकऱ्यांसाठी हमीभाव, बहिणींना भेट म्हणून २१०० रुपये

Nitin Gadkari: भाजपचं पीक वाढलंय, रोग लागतो आता फवारण्याची गरज; नितीन गडकरींनी का व्यक्त केली चिंता?

Dharashiv Assembly Election 2024 : धाराशिव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेनेत थेट लढत!

Star Pravah : मृणाल दुसानिस आणि ज्ञानदा रामतीर्थकरचा मालिकेत कमबॅक ; नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस

Manoj Jarange Patil : तुम्हाला जे करायचे ते करा, पण...... मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाजाला 'हे' मोठे आवाहन

SCROLL FOR NEXT