While providing free insurance facilities by the Agricultural Produce Market Committee, the officers, employees of the Market Committee as well as the directors and farmers present. esakal
जळगाव

Crop Insurance : पीकविमा काढण्यासाठी मोफत सुविधा केंद्र; अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सलग दुसऱ्या वर्षी उपक्रम

Crop Insurance : अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मागील वर्षी मंत्री अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांसाठी मोफत सुविधा केंद्र सुरू केले होते.

सकाळ वृत्तसेवा

Crop Insurance : तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी पीकविमा काढण्यासाठी यंदाही मोफत सुविधा केंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सुरू करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी या मोफत सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती अशोक आधार पाटील यांनी केले आहे. सद्यस्थितीत शासनाने एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना पीकविमा उतरविणे सुलभ व्हावे, यासाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मागील वर्षी मंत्री अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांसाठी मोफत सुविधा केंद्र सुरू केले होते. (jalgaon Free facility center for taking out crop insurance )

या केंद्रावर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवून योजनेचा लाभ घेतला होता. यंदाच्या देखील बाजार समितीच्या कार्यालयात पीक विमा उतरविण्यासाठी मोफत सुविधा केंद्र सुरू केले आहे. या वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा सुविधा केंद्र नि:शुल्क दरात १ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा प्रारंभ सभापती अशोक पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आला. (latest marathi news)

या वेळी बाजार समितीचे संचालक यांच्यासह कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीकविमा काढण्यासाठी पीकपेरा असलेला सात/बारा उतारा, ८ अ उतारा, आधारकार्ड, बँक पास बुक झेरॉक्स, स्वयंम घोषणापत्र, सामायिक क्षेत्र असल्यास १०० रुपयांच्या स्टॅम्पवर संमती पत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे. पीक विमा काढण्यासाठी अंतिम मुदत १५ जुलै २०२४ पर्यंत आहे.

तरी कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील, खासदार तथा संचालक स्मिता वाघ, सुभाष पाटील, डॉ. अशोक पाटील, डॉ. अनिल शिंदे, भोजमल पाटील, समाधान धनगर, सचिन पाटील, नितीन पाटील, प्रफ्फुल पाटील, हिरालाल पाटील, पुष्पा पाटील, सुषमा देसले, भाईदास भिल, प्रकाश अमृतकार, वृषभ पारेख, शरद पाटील आदी संचालकांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT