Head of Department and Principal Nandini Morankar and teachers giving free passes to students at NES Girls High School. esakal
जळगाव

Jalgaon : पारोळ्यात हजार विद्यार्थिनींना मोफत पासचा लाभ! योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; 771 मुलांना शाळेतच मिळाल्या सवलतीत पास

संजय पाटील

पारोळा : विद्यार्थ्यांचे पास काढण्यासाठी तास बुडायला नको अथवा त्यांनी शाळेत गैरहजर राहू नये, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना शाळेतच पास देण्यात आल्या. एनइएस गर्ल्स हायस्कूल येथे मंगळवारी (ता. २५) पास वितरण करण्यात आले. (Jalgaon Free pass to thousands of students in Parola)

पारोळा तालुक्यात विविध शाळांमध्ये महामंडळाकडून पासचे वाटप सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी मोफत पास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी आगारातर्फे करण्यात आले आहे. तालुक्यातील जवळपास सर्व शाळांमध्ये अमळनेर आगाराचे प्रमुख इम्रान पठाण, चंद्रकांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा बसस्थानकाचे पास विभागप्रमुख योगेश घोडके, अनिल बडगुजर, प्रकाश भालेराव यांनी पारोळा शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रत्यक्षपणे पास वितरण केले.

या वेळी एनईगर्ल्स हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक एन. एस. मोराणकर, एस. यू. अहिरे, बी. डी. खैरनार, सुनील झडप, अतुल वाणी, श्री. शेख, आर. वाय. पाटील आदी उपस्थित होते. तालुक्यात पाच हजारावर विद्यार्थी बसने ये-जा करतात. आतापर्यंत ९९७ विद्यार्थिनींना शाळेत मोफत पास वितरण करण्यात आले आहे. तसेच ७७१ विद्यार्थ्यांनी कार्यालयात जाऊन पास घेतली आहे. महिनाभरात जवळपास सर्व पासेस वितरण पूर्ण होईल, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. (latest marathi news)

पालकांकडून कौतुक

ग्रामीण भागात अनेकदा पालकांकडे विद्यार्थ्यांच्या पाससाठी पैसे नसतात. किंबहुना तासिका बुडवून एसटीच्या खिडकीवर पास काढण्यासाठी तासंतास उभे राहावे लागत होते. परंतु आता शाळेतच पास मिळाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच विद्यार्थिनींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत मोफत पास मिळत असल्याने पटसंख्येत भर पडणार आहे. दरम्यान, उर्वरित सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्वरित पास द्यावेत. जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT