Jitendra Jain, Hanif Bagwan returning his lost wallet to his mother. Neighbors Vikar Khan, Lukman Shaikh, Syed Hidayat. esakal
जळगाव

Jalgaon News : तांबापुऱ्यातील फळ विक्रेत्याने घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील तांबापुरा भागातील फळ विक्रेत्याने सापडलेले महत्त्वाच्या कागदपत्रांचे पाकीट संबंधितांना परत करून प्रामाणीकपणाचे दर्शन घडविले. तांबापुऱ्यातील रहिवासी हनीफ अजीज बागवान लोटगाडीवर ख्वाजामियॉं दर्गाजवळ फळ विक्री करतो. त्याची घरची परिस्थितीही जेमतेम आहे. या व्यवसायावरच तो कुटंबाचा उदारनिर्वाह करतो. शुक्रवारी (ता. १२) रात्री नऊला हनीफ आपली लोटगाडी तांबापुऱ्याकडे नेत असताना, रिंग रोडवर हॉटेल सायलीजवळ एक मनी पाकीट त्याला आढळले. ( fruit seller in Tambapura made show of honesty )

त्यात आधार कार्ड, पॅन कार्ड, चालक परवानासह काही रोकड होती. शिवाय काही महत्त्वाचे पुरावे होते. मात्र, त्यावर संबंधितांचा संपर्क क्रमांक नसल्याने आता पाकीट खऱ्या मालकापर्यंत कसे पोहोचवायचे, असा प्रश्‍न त्याला पडला होता. त्याचा विचार करून तांबापुरा केव्हा गाठले, हे त्यालाच कळले नाही. घरी बहीण सुमय्याबी हिच्या मदतीने संबंधिताचा मोबाईल क्रमांक शोधला. जैन इरिगेशन सिस्टिमचे व्हिजिटिंग कार्डवर जितेंद्र जैन यांचा मोबाईल क्रमांक मिळाला.

त्यांना श्‍यामतारा कॉम्प्लेक्ससमोरील शहीद अब्दुल हमीद चौकात बोलविले. श्री. जैन आईसोबत त्या ठिकाणी पोहोचले. हनीफजवळ पाकीट बघून त्यांनी आनंद अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पाणावलेल्या डोळ्यांनी श्री. जैन यांनी हनीफच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. मी सायंळपासून पाकिटाची शोधाशोध करत मी निम्मे शहर पिंजून काढले होते. एकीकडे माझे आजोबा एका खासगी रुग्णालयात दाखल आहेत.

दुसरीकडे माझे विशेष पुरावे असलेला पाकीट हरविल्यामुळे माझ्यावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला होता. यामुळे मी फार हादरून गेलो होतो. मात्र, तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसामुळे मला माझे हरविलेले पाकीट मला भेटू शकले, असे श्री. जैन यांनी या वेळी सांगितले. विकार खान, नियाजोद्दीन शेख, लुकमान शेख, सय्यद हिदायत, आसिफ शाह बापू यांच्या उपस्थितीत हरविलेले पाकीट श्री. जैन यांना परत देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT