Citizens of Japan's Jin area make their way through mud and pits for a funeral procession esakal
जळगाव

Jalgaon News : चिखल, खड्ड्यातून निघाली अंत्ययात्रा! अमळनेर पालिकेवर जपान जीन भागातील नागरिकांची धडक

Jalgaon News :

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : शहरातील जपान जीनच्या सर्वच भागांत चिखल झाल्याने अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांचे हाल झाले. मात्र, महिलेला मृत्यूनंतरही हालाअपेष्टा व सर्कस करीत दफनभूमीत जावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट नगरपालिकेवरच धडक देत तीव्र नाराजी व्यक्त केली. (Jalgaon Funeral procession started from mud pit)

शहरातील जपान जीन भागात सुमारे १५० घरे आहेत. नगरपालिकेकडून नियमित करवसुली केली जाते. गेल्या वर्षभरात नगरपालिकेला मुलभूत सुविधा रस्ते व गटारी करण्याबाबत तीन ते चार वेळेस निवेदन दिले. त्यानंतरही नगरपालिकेने या भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप युवक काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद अझहरअली शौकतअली यांनी केला.

दरम्यान, मंगळवारी (ता. ३०) रात्री दहाला या भागातील महिला तस्लिमबी हमीदखॉं पठाण यांचा आजारामुळे मृत्यू झाला. या भागातील सर्वच रस्त्यांवर प्रचंड चिखल झाल्याने साधे चालणेही मुश्किल आहे, म्हणून अंत्ययात्रा कशी काढावी, असा प्रश्न रहिवाशांना पडला. रात्री मुख्याधिकारी व उपमुख्याधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही, म्हणून सकाळी अझरअली, सलीम हाजी, कलाम अहेलकर, इम्रान शेख नबी सय्यद, आसिफ अली, सलमान बागवान, शाहहरुख पठाण, नईम सिकलीकर, जावेद अली यांनी थेट नगरपालिकाच गाठली. (latest marathi news)

मात्र, अधिकारी सुट्टीवर होते अन्‌ कर्मचारी व्यवस्थित उत्तरे देत नव्हते. अखेरीस तशाच अवस्थेत अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत सहभागी झालेले नागरिक व बाहेरगावाहून आलेल्या नातेवाइकांना सर्कस, कसरत करीत जावे लागले. जनाजा घेऊन जाणाऱ्यांचे पाय घसरत होते. त्यामुळे शवही हालत होते.

नगरपालिकेच्या असुविधांमुळे जिवंतपणी यातना भोगाव्या लागणाऱ्या तस्लिमबीला मृत्यूनंतरही त्रास सहन करावा लागल्याने रहिवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला. दरम्यान, नगरपालिकेने तत्काळ सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत, तर येथील नागरिक कर न भरता मोठे आंदोलन करतील, असा इशारा सय्यद अजहरअली यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT