The crowd at the Sunday market to buy kaira for pickling.  esakal
जळगाव

Jalgaon: पारोळ्यातील कैरी बाजारात ‘गावराण’चा दबदबा! मृगनक्षत्रात पावसाच्या सरी कोसळताच लोणचं तयार करण्यासाठी गृहिणींची लगबग

संजय पाटील

पारोळा : मृगनक्षत्रात पावसाच्या सरी कोसळताच लोणचं तयार करण्यास गृहिणींची लगबग सुरू होते. शहरातील रविवारच्या आठवडे बाजारात मार्केट यार्ड परिसरात कैरी बाजार भरतो. आज रविवारी (ता.९) पहिल्याच कैरी बाजारात राजापुरी व गावराणी या दोन जातींच्या कैरी दाखल झालेल्या होत्या. मात्र, यात गावराणने आपला दबदबा कायम ठेवला. (Jalgaon Gavran dominates raw mangoes market in Parola)

एवढी गावराणकैरी ३० ते ५० रुपये तर राजापुरी ३० ते ४० रुपये किलो दराने विकली जात होती. बाजारात बाराही महिने लोणचं उपलब्ध असते. मात्र, घरगुती लोणच्याची चवच न्यारी असते. त्या पार्श्वभूमीवर महिलावर्गाची लोणचं तयार करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे. दरम्यान, कैरी बाजाराचा पहिलाच आठवडा आहे. त्यामुळे व वातावरणात उकाडा जाणवत असल्याने अनेक गृहिणींनी या आठवड्यात कैरी बाजाराकडे पाठ फिरविली. त्यामुळे सकाळपासूनच बाजारात अल्पसा प्रतिसाद दिसून आला.

पूरक साहित्याला बाजारात तेजी

कैऱ्या घेतल्यानंतर लोणचं तयार करण्यासाठी लागणारे पूरक साहित्यांची मागील वर्षापेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली. त्यात गावराणी लसूण चारशे रुपये किलो, हळद २८० रुपये किलो, तर मिरे १,१०० रुपये किलो दराने विकले जात होते. सोयाबीन तेलाचे भाव १०५ ते ११० रुपये दराने होता.

व्यवसायात पारोळा, अमळनेरचे व्यापारी पारोळा येथील कैरी बाजारात पारोळ्यासह अमळनेर‌, धुळे व धरणगाव येथील व्यापारी विक्रीसाठी येतात. तर लोणच्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांसह आजूबाजूच्या शहरातील व्यापारी येतात. (latest marathi news)

कैरी फोडणीतून रोजगार!

पारोळा येथील आठवडे बाजारातून कैरी घेतल्यानंतर ती घरी न फोडता पाच रुपये किलो दराने कैरी फोडीतून अनेक युवकांना रोजगार मिळाला आहे. दिवसभरात सुमारे पाचशे ते सहाशे रुपये रोज भाग मिळत असतो. त्यामुळे कैरी फोडणारे युवक याबाबत समाधान व्यक्त करीत आहेत.

"मागील वर्षापेक्षा यावर्षी कैरी व्यवसायात तेजी निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे भाजीपाला न विकता रविवारच्या आठवड्या बाजारात कैरी व्यवसाय करीत आहे."

-समाधान गडकरी, कैरीविक्रेता व व्यावसायिक, पारोळा.

"मागील वर्षी कैरीला समाधानकारक भाव होता. मात्र, यावर्षी भावात चढउतार दिसून येत आहे. त्यातच लोणचं तयार करण्यासाठी लागणारे साहित्य यांची भाववाढ झाली. त्यामुळे हिरमोड झालेला आहे."- भुवनेश्वरी मराठे, गृहिणी, पारोळा.

पुढच्या आठवड्यात कैरी बाजारात गर्दी

पहिला आठवड्यात पाहिजे त्या प्रमाणात कैरी खरेदी करण्यासाठी समाधानकारक स्थिती दिसून आली नाही. त्यातच पारोळा तालुक्यात झालेला अल्पशा पावसामुळे वर्षभर वापरण्यात येणारे घरगुती लोणचे उकाळ्यात खराब होऊ नये, यासाठी गृहिणी खबरदारी म्हणून पुढच्या आठवड्यात कैरी खरेदी करतील. त्यामुळे त्या आठवड्यात भावात तेजी व गर्दी दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT