अमळनेर : शहरातील जुन्या वाघ बिल्डिंगच्या मोकळ्या जागेवरील विहिरीत पडलेल्या गायीला नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने जीवदान दिल्याची घटना आज बुधवारी (ता.१८) सकाळी अकराच्या सुमारास घडली. या कामगिरीबद्दल अग्निशमन दल व मदत करणाऱ्या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Giving life to cow that fell in well)
बालाजीपुरा भागातील जुन्या वाघ बिल्डिंगच्या मोकळ्या जागेतील खोल विहिरीत एक गाय पाय घसरून पडली. ही बाब प्लॉटसमोर सुरू असलेल्या बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास आली. त्यांनी परिसरातील रहिवासी छायाचित्रकार अनिल महाजन यांना माहिती दिली. महाजन यांनी लागलीच त्यांचा पुत्र सागर व जवळच्या नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर अमोल माळी, दिनेश माळी यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे प्रमुख दिनेश बिऱ्हाडे, त्यांचे सहकारी, शिवाय रोहित महाजन यांनी शर्थीचे प्रयत्न करून गाईला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. त्यांनतर गायीला चारापाणी करून मोकळ्या जागेत सोडून देण्यात आले. विहिरीत उतरून गायीला बाहेर काढल्याबद्दल दिनेश बिऱ्हाडे, रोहित महाजन यांच्या धाडसाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. (latest marathi news)
दरम्यान, माजी नगरसेवक बाळासाहेब महाजन यांनी अनिल महाजन व रोहित महाजन यांचा रोख बक्षीस देऊन सन्मान केला. तत्परतेने दाखल झालेल्या अग्निशमन दलाचे दिनेश बिऱ्हाडे व त्यांच्या सहकाऱ्यांचाही सत्कार केला. यावेळी लता महाजन, बाळासाहेब महाजन, विलास महाजन, योगेश महाजन, सागर महाजन, दिनेश माळी, महेश पाटील, निंबा वाणी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.