Gold Silver Rate esakal
जळगाव

Jalgaon Gold Silver Rates Hike: अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोने पुन्हा महागले! सोन्यात 450 ची, तर चांदीत 2 हजारांची वाढ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Gold Silver Rates Hike : येत्या १० मेस अक्षयतृतीया आहे. या पार्श्वभूमीवर सोने पुन्हा महागले आहे. सोन्याच्या दरात ४५० रुपयांची, तर चांदीच्या दरात दोन हजारांची वाढ झाली आहे. गामी काळात किमान दोन महिने तरी लग्नसराई नाही. दुसरीकडे सोने, चांदीच्या दर गगनाला पोचल्यामुळे सोने, चांदीच्या मागणीत काहीशी घट झाली आहे. यामुळे सात दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात १८०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तीन हजारांची घट झाली होती. (Jalgaon Gold expensive again in wake of Akshaya Tritiya)

सोन्याचा दर २० एप्रिलला ७६ हजार १४ रुपये होता, तर चांदीनेही ८६ हजार ५२० प्रतिकिलोचा टप्पा गाठला होता. यामुळे सोने, चांदीचे दागिने विकत घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले. गुढीपाडव्याला सोन्याचा दर जीएसटीसह ७४ हजार ३६६ रुपयांवर होता. चांदीच्या दरातही तीन हजारांची वाढ होऊन चांदी ८५ हजार ३८७ रुपयांवर आली होती.

सोन्यातील दरवाढीचा परिणाम गुढीपाडव्याला ग्राहकांच्या खरेदीवर दिसून आला. गुढीपाडव्याचा मुहूर्त असतानाही सोने खरेदीत निम्म घट झाली होती. यामुळे सुवर्ण बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला होता. आता आगामी दोन महिने लग्नसराई नाही. यामुळे सोन्याची मागणी घटली आहे. यामुळे सोने, चांदीचे दर सात दिवसांपूर्वी घसरले होते.

३० एप्रिलला सोन्याचा दर जीएसटीसह ७४ हजार १६० प्रतितोळा, तर चांदी जीएसटीसह ८३ हजार ४३० प्रतिकिलो होती. दहा दिवसांपूर्वी सोन्याचे दर ७६ हजार १४ (प्रतितोळा), तर चांदी ८६ हजार ५२० (प्रतिकिलो जीएसटीसह) होते. सोन्यात १८००, तर चांदीत तीन हजार रुपयांची झालेल्या घटीने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आज मात्र सोन्याच्या दरात ४५० रुपयांची वाढ होऊन सोने जीएसटीसी ७३ हजार ७९९ रुपयांवर पोचले, तर चांदी जीएसटीसह ८५ हजार ४९० पर्यंत पोचली आहे.

सोन्याचे काही दिवसांतील दर (विना जीएसटी)

तारीख--सोने (प्रतितोळा)--चांदी (प्रतिकिलो)

२९ मार्च : ६८ हजार २००--७६ हजार

२ एप्रिल : ६८ हजार ७००--७७ हजार

३ एप्रिल : ६९ हजार ४००--७८ हजार

५ एप्रिल : ७० हजार ६००--८१ हजार

८ एप्रिल : ७१ हजार ८००--८३ हजार

९ एप्रिल : ७१ हजार २००--८२ हजार

१२ एप्रिल : ७३ हजार--८४ हजार

१८ एप्रिल : ७३ हजार ३००--८४ हजार

२० एप्रिल : ७३ हजार ८००--८४ हजार

२६ एप्रिल : ७२ हजार ३००--८२ हजार

३० एप्रिल : ७२ हजार--८१ हजार

४ मे : ७१ हजार २००--८१ हजार

७ मे : ७१ हजार ६५०--८३ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT