Banana Crop esakal
जळगाव

Jalgaon News: केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूशखबर! नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ; पालकमंत्री पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेंतर्गत विमा काढला आहे, अशा केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हिवाळ्यातील कमी तापमानाचा निकषात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास आता हेक्‍टरी ३२ हजार १७९ रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. आधीच्या निकषात ही भरपाईची रक्कम २६ हजार ५०० इतकी होती. (Good news for banana farmers Increase in compensation amount)

एप्रिल महिन्यातील जास्त तापमानाचा निकषात पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आता हेक्टरी ४२ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. ती जुन्या निकषात ३५ हजार रुपये इतकी होती. मे महिन्यात सलग पाच दिवस ४५ अंश तापमान राहिल्यास आता नुकसानभरपाईची रक्कम ५२ हजार ८२१ इतकी करण्यात आली आहे.

ती जुन्या निकषांमध्ये ४२ हजार रुपये इतकी होती. तर गारपीट व वादळी पावसामुळे केळी उत्पादकांचे नुकसान झाल्यास, आता हेक्टरी ८५ हजार रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. ती जुन्या निकषांमध्ये ७० हजार इतकी होती. (latest marathi news)

विमा हप्त्याची रक्कम झाली कमी

ज्या शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित फळ पीकविमा काढणार आहेत. त्या शेतकऱ्यांची विम्याची रक्कमदेखील गेल्या वेळेपेक्षा कमी होणार आहे. २०२३-२४ मध्ये ही रक्कम हेक्टरी १० हजार ५०० रुपये होती. ती आता ८ हजार ५०० रुपये इतकी करण्यात आली आहे.

"शासन नियमानुसार नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून, राज्य सरकारकडून बुधवारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत विमा काढला आहे, अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाईमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे."

- गुलाबराव पाटील, पालकमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT