Lek Ladki Yojana Maharashtra esakal
जळगाव

Lek Ladki Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी जिल्हास्तरीय समिती : अध्यक्ष म्हणून पालकमंत्री पाटील

सकाळ वृत्तसेवा

Lek Ladki Yojana : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत काही निकषांमध्ये बदल केले असून, त्याबाबतचा सुधारित शासन निर्णय शासनाच्या महिला बालकल्याण विभागाने जारी केला आहे. (District Level Committee for Chief Minister Majhi Ladki Bahan Yojana )

त्यानुसार जळगाव जिल्ह्याच्या ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील असणार आहेत, तर सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद काम पाहतील. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीही तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे.

अशी असेल जिल्हास्तरीय समिती

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे. सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद काम पाहतील. जिल्हास्तरीय समितीत सह अध्यक्ष म्हणून संबंधित जिल्ह्याचे मंत्री, सदस्य म्हणून सात प्रशासकीय अधिकारी राहतील. (latest marathi news)

यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, नगर प्रशासनचे जिल्हा सहायुक्त, महापालिकाचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी (उप आयुक्त दर्जापेक्षा कमी नसावे), जिल्हा कार्यक्रम अधिकारी, मुख्याधिकारी, संबंधित एकात्मिक बालविकासाचे प्रकल्पाधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचा समावेश आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची दरमहा बैठक होणार असून, या समितीद्वारे योजनेची देखरेख व संनियंत्रण करणे. योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्चाचा नियमित आढावा घेतला जाणार असून, आवश्यक निधीची मागणी राज्यस्तरीय समितीकडे करण्यात येणार आहे. कालबद्ध पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करणे व योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता या बैठकीत घेतली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT