Mhasavad to Nagduli 33 Km. V. Guardian Minister Gulabrao Patil and others while laying the foundation stone of the link line work. esakal
जळगाव

Jalgaon News : म्हसावद परिसरातील 19 गावांना अखंडित वीज : पालकमंत्री पाटील

Latest Jalgaon News : तालुक्यातील म्हसावद येथील ३३/११ के. व्ही. उपकेंद्र येथे जिल्हा नियोजन व विकास समिती (डी.पी.डी.सी)अंतर्गत मंजूर ३३ के.व्ही. नागदूली ते म्हसावद ह्या उच्चदाब वाहिनीचे कामाचे भूमिपूजन आज पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते म्हसावद येथील वीज उपकेंद्रात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : उद्योगधंदे यांच्या विद्युतीकरणाचा प्रश्न या शिरसोली उपकेंद्रामुळे सुटणार आहे. ३४ कोटी ५२ लाख निधीतून म्हसावद व परिसरातील रुग्णांना आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी, यासाठी सर्व सुविधायुक्त ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. म्हसावद परिसरातील १९ गावांना अखंडीत वीजपुरवठा होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. (Uninterrupted electricity to 19 villages in Mhasavad area)

तालुक्यातील म्हसावद येथील ३३/११ के. व्ही. उपकेंद्र येथे जिल्हा नियोजन व विकास समिती (डी.पी.डी.सी)अंतर्गत मंजूर ३३ के.व्ही. नागदूली ते म्हसावद ह्या उच्चदाब वाहिनीचे कामाचे भूमिपूजन आज पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते म्हसावद येथील वीज उपकेंद्रात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

म्हसावद ते नागदुली ३३ के. व्हीं. लिंक लाईनचे काम दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे म्हसावद व परिसरातील उन्हाळ्यातील विजेचा लपंडाव कायमस्वरूपी बंद होणार आहे. सुमारे ८० कोटी रुपयांच्या शिरसोली १३२ के. व्हीं उपकेंद्र मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या उपकेंद्रामुळे जळगाव शहर व जळगाव ग्रामीण भागातील प्रमुख उपकेंद्रांना सुरळीत दाबाने वीजपुरवठा होणार आहे. (latest marathi news)

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन सोनवणे, शिवराज पाटील, नारायण चव्हाण, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोपाळ महाजन, शाखा अभियंता आव्हाड, माजी सभापती नंदलाल पाटील, समाधान चिंचोरे, सरपंच गोविंदा पवार, उपसरपंच संजय मोरे, सदस्य आबा चिंचोरे, हौसीलाल भोई, महेंद्र राजपूत आदी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता जयंत चोपडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन माजी उपसरपंच शितल चिंचोरे यांनी केले. आभार उपअभियंता विजय कपुरे यांनी मानले.

या गावांना मिळणार दिलासा

म्हसावद उपकेंद्रअंतर्गत म्हसावद व वावडदा परिसरातील १९ गावांतील सर्व घरगुती व शेतीपंप ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळणार आहे. म्हसावद, बोरनार, लमांजन, वाकडी, कुऱ्हाडदे, डोमगाव, पाथरी, वडली, वावडदा, रामदेववाडी, इतर गाव तसेच तांड्यांना फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT