An unguarded power line in the main market at Parola. esakal
जळगाव

Jalgaon News : मुख्य बाजारपेठेत वीजतारांची गार्डीन आवश्यक! महावितरणने पाठपुरावा करावा; पारोळा येथे नागरिकांची मागणी

Jalgaon News : मागील वर्षी पावसाळ्यात जुने पोस्ट गल्ली हॉटेल महाराष्ट्र उपहारगृहाजवळ विजांचा तारांमुळे भाजी विक्रेत्याला आपला जीव गमावा लागला होता

संजय पाटील

पारोळा : येथील मुख्य बाजारपेठेतून विजांचा तारा गेलेल्या आहेत. मात्र, त्यांना गार्डीन नाहीत. त्यामुळे वादळवाऱ्यात त्या तुटून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी बाजारपेठेत राहिलेली गार्डीन महावितरणने पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मागील वर्षी पावसाळ्यात जुने पोस्ट गल्ली हॉटेल महाराष्ट्र उपहारगृहाजवळ विजांचा तारांमुळे भाजी विक्रेत्याला आपला जीव गमावा लागला होता. त्यानंतर महावितरणने त्या परिसरात तत्काळ गार्डीन केली होती. मात्र, पुढचा परिसर अजूनदेखील तसाच राहिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात तीच परिस्थिती उद्भवू नये, यासाठी महावितरण कंपनीने शहरातील मुख्य बाजारपेठेत तत्काळ गार्डिंन करून महत्वकांक्षी प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी केली आहे. (Jalgaon Guards of electricity cables required in main market Mahavitaran)

दरम्यान, मुख्य बाजारपेठेत विविध प्रकारची दुकाने असल्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. दरम्यान, महाराष्ट्र उपहारह ते नगरपालिका चौक तसेच नगरपालिका चौक ते तलाव गल्ली, तलाव गल्ली ते कजगाव नाका, नगरपालिका चौक ते बालाजी मंदिर, जुने पोस्ट गल्ली ते राष्ट्रीय महामार्ग अशा महत्त्वपूर्ण परिसरात वीजतारा गेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी

केबल वायर टाकली गेली आहे. मात्र, मुख्य बाजारपेठेत गार्डिंन नसल्याने वादळवाऱ्यामुळे वीजतारा खाली लोंबकळत असतात किंवा त्या जमिनीवर येतात. त्यामुळे या तारांचा स्पर्श झाल्यास जीवितहानी होऊ शकते. यासाठी महावितरण पावसाळ्यापूर्वीच मुख्य बाजारपेठेत गार्डिंन करून घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

या ठिकाणी गार्डिंग होणार

जुने पोस्ट गल्लीतील बादशहा चहा हॉटेल ते शिरोळे प्रोव्हीजन, शिरोळे प्रोव्हीजन ते जनता बँक, गावहोळी चौक ते महाराष्ट्र बँक, कजगाव नाका ते तांबेनगर.

(Latest Marathi News)

या ठिकाणी केबल वायर

धरणगाव अर्बन बँक ते मिसर हॉस्पिटलपर्यंत, पाताळेश्वर परिसर, नगरपालिका हद्दीतील नवीन वसाहती, बाजारपेठचा काही भाग महावितरणने शहरातदेखील सर्वे करावा. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वीजतारा आहेत. काहीतरांना बरेच वर्ष झाली आहेत. तर काही ठिकाणी

तारा अगदी घराजवळ लोमकळत आहेत. यासाठी महावितरण पावसाळ्यापूर्वी शहरातील अनेक भागात सर्वे करून बदलण्यासारख्या विद्युत तारा तत्काळ बदलून होणारे संभाव्य धोके टाळावेत ,अशी मागणी होत आहे.

"साधारणपणे गार्डिंग व केबल वायर सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. एक ते दोन दिवसात गार्डिन व केबल वायर कामाला सुरुवात होईल."-गौतम मोरे, शहर‌ अभियंता, महावितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT