Driver and Gutkha worth crores caught by plainclothes police with container esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मध्यप्रदेशातून येणारा पावणे 2 कोटीचा गुटखा जप्त; आयजी पथकाची कारवाई

Jalgaon Crime : मध्यप्रदेशातून १ कोटी ६१ लाख रुपयांचा गुटखा घेवुन महाराष्ट्रात येणाऱ्या कंटेनर पाठलाग करुन आयजी पथकाने बऱ्हाणपूर चौफुलीजवळ सिनेस्टाईल पकडला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : मध्यप्रदेशातून १ कोटी ६१ लाख रुपयांचा गुटखा घेवुन महाराष्ट्रात येणाऱ्या कंटेनर पाठलाग करुन आयजी पथकाने बऱ्हाणपूर चौफुलीजवळ सिनेस्टाईल पकडला. थेट आयजी पथकाने कारवाई केल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे. महाराष्ट्रात गुटखा आणि सुंगधीत तंबाखूला बंदी असतांना मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होते. मध्यप्रदेशातून दोन ते तीन कंटेनर तर, गुजरात राज्यातून सिमावर्ती चाळीसगाव-धुळे-अमळनेर येथे कोट्यावधीचा माल उतरवला जातो. ()

मध्यप्रदेशातून गुटख्याचे कंटेनर (एचआर ५५ एक्यू ३८७३ ) एक कोटीचा गुटखा घेवुन येत असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना मिळाली होती. उपनिरीक्षक अरुण भिसे, तुषार पाटील. विक्रांत मांगडे, विजय बिलगे , प्रमोद मंडलिक, सुरेश टोंगारे यांच्या पथकाने मुक्ताईनगर मार्गे जिल्‍ह्‍यात शिरतांना रात्री दिडच्या सुमारास पाठलाग करुन कंटेनर थांबविला. (latest marathi news)

कंटेनरच्या तपासणीत १ कोटी ६१ लाख १७ हजार ८०० रुपयांचा गुटखा आढळला. वाहातूकदार सतीश शर्मा (रा. दिल्ली) त्यागी रा. जयपुर व त्यांचा हस्तक मुबारक (रा. दिल्ली) व कंपनी मालक नीलू पंजाबी उर्फ निशू (रा. भिवाडी राज्य राजस्थान) यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुटखा माफियांत दहशत

दिवसा आड जळगाव जिल्‍ह्‍यात गुजरात आणि मध्यप्रदेशातून कोट्यावधी रुपयांच्या गुटख्याची तस्करी करण्यात येते.स्थानिक पोलिस, अन्न व औषध प्रशासन किरकोळ विक्रेत्यांवर गुन्हेदाखल करुन समाधानी असतांना थेट नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या पथकाने कारवाई केल्याने गुटखा माफीयांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर या कारवाईने प्रश्न उपस्थीत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT