Villagers walking through knee-deep water in the main square of the village. esakal
जळगाव

Jalgaon Rain Damage : साकळी, दहिगाव परिसरात मुसळधार! भोनक, होरी नदीला पूर; काही घरांमध्ये शिरले पाणी

Jalgaon News : दमदार पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असून, शेतीकामांही वेग आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

साकळी/दहिगाव (ता. यावल) : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मॉन्सूनच्या पावसाने गुरुवारी (ता. २७) साकळी, दहिगावसह परिसरात दमदार हजेरी लावली. यंदाच्या जून महिन्याच्या सुरवातीपासूनच परिसरात उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. शेतातील पिके सुकू लागली होती.

वातावरणात भीषण उष्मा जाणवत होता. यातून सुटका होण्यासाठी गावासह परिसरातील ग्रामस्थ पावसाची चातकासारखी वाट पाहत होते. परंतु आज आलेल्या दमदार पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असून, शेतीकामांही वेग आला आहे. (Jalgaon Heavy rain in Sakli Dahigaon area)

गेल्या एक-दोन दिवसांपासून गावासह परिसरात हलक्या पावसाची हजेरी लागली होती. मात्र शेतकऱ्यांसह सर्वजण दमदार पावसाची वाट पाहत होते. दरम्यान गुरुवारी (ता. २७) दुपारपासूनच वातावरणात बदल होऊन आकाशात काळ्या ढगांनी एकच गर्दी केलेली होती.

दुपारी तीन ते सव्वातीनच्या दरम्यान गार वारा सुटून जोरदार पावसाला सुरवात झाली. जवळपास अर्धा ते पाऊण तास दमदार पाऊस कोसळला. गावातील रस्त्यांवरून पावसाचे पाणी चांगलेच वाहून निघाले. मुख्य चौकातही नागझिरी नाल्यास पावसाचे पूरसदृश्य पाणी आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

या ठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी वाहत होते. जमिनीलगत काही दुकानांमध्येही पाणी शिरले असल्याचे समजते. नागझिरीच्या नाल्यातून गाव परिसराचा मुख्य वापराचा रस्ता आहे. या रस्त्याच्या भागातून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी परिश्रम घेत होते. तर नागरिकही वाहत्या पाण्याचा मनमुराद आनंद घेत होते.

या पावसाच्या दरम्यान दीड ते दोन तासांच्या जवळपास वीज गायब झाली होती. पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता व वातावरण आल्हादायक बनले होते. या पावसाचा मका ,ज्वारी तसेच कापूस व इतर सर्व रब्बी पिकांना चांगलाच फायदा होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या दाहकतेमुळे शेतातील पिके ही सुकू लागली होती तर पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे. आजच्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. (latest marathi news)

दहिगाव शेतशिवार चिंब; शेतकऱ्यांना दिलासा

दहिगाव (ता. यावल) : येथे व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. यात गुरुवारी (ता. २७) दुपारी तीनच्या सुमारास समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर भोनक नदी आणि होरी नदीला पूर आला. नदीवर बांधकाम सुरू असताना बांधकामासाठी लावलेले साहित्य वाचविण्यासाठी मजुरांची धावपळ उडाली. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना जोरदार पावसाचे प्रतीक्षा होती. काही प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी त्याच परिस्थितीत खरीप पेरणी करून घेतलेली आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला आहे.

नदीच्या पुरातून निघाली अंत्ययात्रा

दहिगाव परिसरात आज आलेल्या पावसाने नदी, नाल्यांना पूर आला. दरम्यान, गावातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याने त्याची अंत्ययात्रा पूल नसल्याने होरी नदीच्या पुरातून नेण्यात आली. तसेच नागरिकांना अंत्यविधीसाठी या पुरातूनच जीव मुठीत घेऊन जावे लागले. या नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, सावखेडासिम येथील भोनक नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे येथील मजुरांची धावपळ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT