Heavy Rain  Sakal
जळगाव

Jalgaon Heavy Rain : जिल्ह्याच्या 6 महसूल मंडळांत अतिवृष्टी, अनेक भागांत रात्री मुसळधार; खरिपाचे मोठे नुकसान

Heavy Rain : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (ता.११) रात्री मुसळधार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या विजेच्या तारा तुटून पडल्या.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (ता.११) रात्री मुसळधार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या विजेच्या तारा तुटून पडल्या. काही ठिकाणी रात्रभर नागरिकांना विजेविना राहावे लागले. जिल्ह्यात सहा महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाचे धुमशान सुरू आहे. दरम्यान, रात्री जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. (Heavy rains in 6 revenue circles of district heavy rains in many areas at night )

अनेक ठिकाणी कपाशीला बोंडे फुटून कापूस बाहेर येत होता. त्यावर पाऊस पडल्याने कापसाचा दर्जा खालावणार आहे. काही ठिकाणी कपाशीला बोंडे लागली होती. ती धुवाधार पावसाने गळून पडली आहेत. आज सुटीचा दिवस असल्याने अजूनही शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू झालेले नाहीत. गत महिन्यातील तब्बल आठ दिवस जोरदार पावसाने खरीप पिकांचे नुकसान केले होते. आता पुन्हा दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.

या मंडळात अतिवृष्टी

पिंपळगाव (ता. भुसावळ)- ६२.८, कुऱ्हा (ता. मुक्ताईनगर)- १२४.५, वाकडी (ता. जामनेर)-६७.३, फत्तेपूर (ता. जामनेर)-९१.५, शेंदुर्णी-८३, तोंडापूर-९०.५. (latest marathi news)

तालुकानिहाय पाऊस असा

तालुका-- पाऊस मिलिमीटर

जळगाव--५०.३

भुसावळ--५३.७

यावल--२४.१

रावेर--३१.३

मुक्ताईनगर--६३.४

अमळनेर--३१.६

चोपडा--१८.९

एरंडोल--२८.६

पारोळा--३७.४

चाळीसगाव--१६.५

जामनेर--६१.९

पाचोरा--३७.४

भडगाव--२३.४

धरणगाव--२६.८

बोदवड--६३.७

एकूण--३५.५ सरासरी

''सर्व तहसीलदार, प्रांताधिकारी, कृषी विभागांना नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. लवकरात लवकर नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. अहवाल आला की शासनाकडे पाठवू.''- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT