Household items burnt in the fire. esakal
जळगाव

Jalgaon Fire Accident : बोदवड शहरात घराला आग; 5 क्विंटल कपाशी, रक्कम खाक

Fire Accident : शहरातील सहकार नगरमधील मुकेश दयाराम बडगुजर यांच्या घराला बुधवारी (ता. २) सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास भीषण आग लागली.

सकाळ वृत्तसेवा

बोदवड : शहरातील सहकार नगरमधील मुकेश दयाराम बडगुजर यांच्या घराला बुधवारी (ता. २) सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत बडगुजर यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, घरात असलेली पाच क्विंटल कपाशी व दीड लाख रुपये रोख जळून खाक झाले. बडगुजर यांच्या घरातील सर्व मंडळी सकाळी नऊच्या सुमारास शेतात गेले होते. या दरम्यान घराच्या आतून धुराचे लोळ येत असल्याचे शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी नगरसेवक भरत पाटील व संजय गायकवाड यांना सांगितले. ( House fire in Bodwad city consumes 5 quintals of cotton )

त्यानंतर तत्काळ फायर ब्रिगेड बुलेटला पाचारण करण्यात आले. या आगीत जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, घरात असलेली पाच क्विंटल कपाशी व जय माता की जीनिंगमधून आणलेली १ लाख ६२ हजार रुपये प्लॉटचा व्यवहार करण्यासाठी रक्कम घरात ठेवलेली होती. ती रक्कमही जळून खाक झाली. यावेळी भरत पाटील यांनी मुकेश बडगुजर यांना २१०० रूपये मदत दिली. नगराध्यक्ष आनंदा पाटील, हर्षल बडगुजर, सुनील बोरसे, गोपाल गंगतिरे यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी मदतीचा हात पुढे केला. या वेळी फायर बुलेट चालक मुनाफ व फायरमन संदीप तायडे यांनी आग विझविली. तलाठी जे. एस. सुरवाडे व कोतवाल रामभाऊ देशमुख यांनी पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT