jail esakal
जळगाव

Jalgaon News : पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला मरेपर्यंत जन्मठेप; पळून जाण्याच्या संशयातून खून

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : वाघडु (ता.चाळीसगाव) येथील भिकन भाऊराव पवार याला पत्नी अन्नपूर्णा बाईच्या हत्येप्रकरणी पती विरुद्ध दोषारोप निश्चीत होवुन जिल्‍हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. चाळीसगाव तालुक्यातील वाघडू गावात भिकन भाऊराव पवार, पत्नी अन्नपूर्णा यांच्यात विवाह बाह्य संबंधाच्या संशयावरून वाद होता. पाच वर्षापूर्वी १८ मे २०१९ ला पहाटे अन्नपूर्णाबाई घराच्या अंगणात झोपलेली असताना भिकन पवार याने तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. ( Husband sentenced to life imprisonment for wife murder)

ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ जखमी अवस्थेत धुळे येथे हलविले होते. मात्र उपचार सुरु असताना दुसऱ्या दिवशी अन्नपूर्णाबाईचा मृत्यू झाला. पोलिस पाटलांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तपासाधिकारी उपनिरीक्षक युवराज रबडे यांनी जाब-जबाब, पंचनामे केल्या नंतर दोषारोपपत्र जळगाव जिल्‍हा व सत्र न्यायालयात सादर केले. न्या. जे.जे.मोहिते यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरु होते.

सरकारी अभियोक्ता नीलेश चौधरी यांनी संशयित भिकन पवार याची संशयीवृत्ती तसेच गुन्हा घडण्यापूर्वी तीन महिने अगोदर त्याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर १३ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून घेतल्या. त्यात तक्रारदार पोलिस पाटील साहेबराव पाटील, मच्छिंद्र खैरनार यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या.

मरेपर्यंत जन्मठेप

संशयिताकडून वय वर्षे ६० असून गुन्हा घडल्या पासून कारागृहात आहे. त्यामुळे कमी शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आला. जिल्‍हा व सत्र न्यायालयात न्या.जे.जे.मोहिते यांच्या न्यायालयात दोषारोप सिद्ध होऊन भिकन पवार यास न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा झाली.

कबुली जबाब ग्राह्य

न्यायालयाने पोलिसपाटील यांच्या समक्ष भिकन पवार या आरोपीने मीच हत्या केल्याचा कबुली जबाब दिला होता. सरकार पक्षाने हा मुद्दा उपस्थित केल्यावर बचावपक्षाने कायद्याचा दाखला देत हा कबुली जबाब ग्राह्य (ॲडमीसेबल) धरु नये असा बचाव केला. मात्र ॲड.निलेश चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे मांडतांना कुठल्याही दबावात नसतांना स्वतःहून कबुली दिल्याची परिस्थिती ग्राह्य धरण्याची केलेली विनंती न्यायालयात मान्य करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT