Crop Insurance esakal
जळगाव

Crop Insurance : शेतकऱ्यांना पीकविम्याचा दिलासा; अमळनेर तालुक्यात 68 हजार नुकसानग्रस्तांना लाभ

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम २०२३ मधील उर्वरित ७५ टक्के पीकविमा मंजूर झाला असून, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून ६८ हजार ८५० शेतकऱ्यांना जवळपास ४२ कोटी रकमेचा पीकविमा मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी दिली. (In Amalner taluka 68 thousand farmers benefited from Crop Insurance)

जळगाव येथे मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या पीकविम्याची रक्कम वितरित करण्याचे आदेशही झाले असून, ही रक्कम ऑगस्ट अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती भागवत पाटील यांनी दिली. दरम्यान, या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भागवत पाटील यांनी म्हटले आहे.

की अमळनेर तालुक्यातील आठही महसूल मंडळांना २५ टक्के अग्रीम रक्कम यापूर्वीच जवळपास ५७ हजार शेतकरी बांधवांच्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट जमा झालेले आहेत तर फेब्रुवारी, मार्च महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानीचे पंचनामे झालेल्या १ हजार ७१४ शेतकरी बांधवांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आलेले आहेत.

आता उंबरठा उत्पन्न व पीक कापणी प्रयोगाच्या अंती अमळनेर तालुक्यातील सर्व आठही महसूल मंडळातील उर्वरित ७५ टक्के रकमेसाठी ५५ हजार ८२४ शेतकरी पात्र झाले असून, त्यांच्या खात्यावर जवळपास ३७ कोटी रुपये जमा होतील. (latest marathi news)

तर अमळनेर मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील बहादरपूर व शेळावे बुद्रुक या दोन महसूल मंडळातील १२ हजार ८२६ पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावर जवळपास ६ कोटी रुपये ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत ओरिएन्टल इन्शुरन्स प्रा. लि. कंपनीकडून शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होतील. म्हणजेच एकूण ६८ हजार ६५० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

खरीप पीकविम्यातून ८४ कोटी

मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नानी अमळनेर विधानसभा मतदार संघात खरीप पीक विमा २०२३-२४ या हंगामात शेतकरी बांधवांना एकूण ८४ कोटी ५१ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. हा खरीप पीकविमा मंजूर झाल्यामुळे खोट्या वल्गना करणाऱ्या विरोधकांना चपराक बसली असून.

यावरून महायुती सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याचेही स्पष्ट झाले असल्याचे पत्रकात म्हटले आहे. मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या वतीने महायुती सरकार तसेच मंत्री अनिल पाटील यांचे आता जाहीर आभार भागवत पाटील यांनी मानले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT