Jalgaon Lok Sabha Election  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : जळगावात 45, रावेरसाठ 36 अर्ज दाखल; जिल्हाधिकारी कार्यालयास यात्रेचे स्वरुप

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर गुरुवारी (ता. २५) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची मोठी गर्दी झाली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर गुरुवारी (ता. २५) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची मोठी गर्दी झाली. अखेरच्या दिवसापर्यंत जळगाव मतदारसंघातून ४५, तर रावेर लोकसभेसाठी एकूण ३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव व रावेर मतदारसंघासाठी प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया १८ एप्रिलपासून सुरू झाली. (Jalgaon In backdrop of Lok Sabha elections there was huge crowd of candidates on last day of filing applications on Thursday)

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत २५ एप्रिलपर्यंत होती. शेवटच्या दिवशी गुरुवारी जळगाव लोकसभा मतदारसंघात १७ उमेदवारांनी २१ अर्ज, तर रावेर मतदारसंघात ११ उमेदवारांनी १८ अर्ज भरले. जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण ३१ उमेदवारांनी ४५ अर्ज दाखल केले आहेत, तर रावेर लोकसभा मतदारसंघात २५ उमेदवारांनी ३६ अर्ज दाखल केले आहेत. (Latest Marathi News)

आज अर्जांची छाननी

निवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघांमधून दाखल झालेल्या अर्जांची छाननी शुक्रवारी (ता. २६) होणार आहे. छाननीनंतर चिन्हवाटप होईल. निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठी २९ एप्रिलपर्यंत मुदत असून, त्यानंतर रिंगणात शिल्लक राहिलेल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. निवडणुकीसाठी १३ मेस मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT